संतापजनक… आजोबाचे कुकर्म लपविण्यासाठी नातीने ब्लेडने चिरला नवजात बाळाचा गळा

सातारा : पोलीसनामा आॅनलाइन – आजोबा आणि नातीच्या नात्याला काळामी फसणारी संतापजनक घटना साताऱ्यातील फलटण तालुक्यातील बागेवाडी बरडमध्ये घडली आहे. एका नराधम आजोबाने आपल्याच नातीवर बलात्कार केला. यातून ती गर्भवती राहिली. गर्भवती नातीने एका बाळाला जन्म दिल्यानंतर आजोबाचे हे कुकर्म समाजासमोर आल्यानंतर आपली बेइज्जती होईल या भितीपोटी नातीने नुकत्याच जन्मलेल्या बाळाची ब्लेडने गळा कापून हत्या केली. फलटण ग्रामीण पोलीसांनी नराधम अजोबाविरोधात बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अल्पवयीन मुलीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

सेक्स रॅकेट चालविण्यासाठी त्यांनी गोव्यात बंगलाच घेतला भाड्याने 

याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शामराव बाजीराव जाधव (रा.बागेवाडी बरड, ता. फलटण) याने खुरंगे मळ्यात जानेवारी २०१८ ते मार्च २०१८ या कालावधीत अल्पवयीन नातीवर बलात्कार केला होता. याबाबत कोणास सांगितले तर तुला जीवे मारून टाकीन अशी धमकी त्याने नातीला दिली. धमकीच्या भीतीने नातीने हा प्रकार कुणालाही सांगितला नाही. त्यानंतर आजोबाने तिला चार वेळा खुरंगे मळ्यात गवत आणण्याच्या निमित्ताने नेऊन बलात्कार केला. दरम्यान, ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. तिने ११ नोव्हेंबर २०१८ रोजी एका मुलाला जन्म दिला. हा प्रकार लोकांना कळला तर तिची व आजोबाची बदमानी होईल म्हणून तिने बाळाच्या गळ्यावर ब्लेडने वार करून खून केला. नंतर बाळाचा मृतदेह तिने ऊसाच्या शेतात पुरला.

या प्रकरणी सूर्यदास निगडे (रा. बागेवाडी बरड) यांनी अल्पवयीन मुलीविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर सर्वप्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी आजोबा शामराव बाजीराव जाधवविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. तर अल्पवयीन मुलीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.