ग्रेटर नोएडात २ इमारती कोसळल्या, दोघांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : वृत्तसंस्था 

येथे एक चार मजली आणि सहा मजली इमारतीचे बांधकाम सुरु असलेल्या अशा दोन इमारती कोसळयाची मोठी दुर्घटना घडली आहे. ग्रेटर नोएडाच्या शाहबेरी परिसरात मंगळवारी रात्री उशीरा या दोन्ही इमारती कोसळल्या.

यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ५० जण ढीगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.पोलीस आणि एनडीआरएफची चार पथकं घटनास्थळी असून बचावकार्य सुरू आहे. स्थानिकांच्या मदतीनं पोलीस आणि एनडीआरएफचे जवान बचावकार्य राबवत आहेत.तर दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे.

[amazon_link asins=’B07CYRGPR2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bbafc75c-8a3c-11e8-9b81-f76bf13973c9′]

दोन इमारतींपैकी एका इमारतीत 10-12 कुटूंब राहत होती. चार मजली इमारत जीर्ण झाली होती, तर दुसऱ्या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. मंगळवारी रात्री परिसराता मोठा आवाज झाला. परिसरातील घाबरलेल्या लोकांनी भुकंप झाल्याचं समजून घराबाहेर पळ काढला. त्यावेळी दोन इमारती कोसळल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मात्र इमारती कोसळण्याचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

घटनेची माहिती मिळताच गाझियाबाद पोलीस, नोएडा पोलीस आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं. श्वान पदकाच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. केंद्रीय मंत्री महेश शर्मा घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्याचा आढावा घेत आहेत.