जातीचा नव्हे, मातीचा अभिमान घेऊन मोठे व्हा : पंकजा मुंडे

ठाणे : पोलिसनामा ऑनलाईन

विद्यार्थी म्हणून जातीचा नव्हे, मातीचा अभिमान घेऊन मोठे व्हा, गरीब आईबापांच्या कष्टाचं चीज करण्यासाठी शिका`असे भावनिक उद्गार काढत महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी किन्हवलीतील शेकडो विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

14 वर्षांपूर्वी किन्हवलीसारख्या अतिदुर्गम भागात विद्या प्रसारक मंडळाने सुरू केलेल्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त स्व.गोपीनाथ मुंडे सभागृहात आयोजित सोहळ्यात त्या बोलत होत्या.
[amazon_link asins=’B07659WJJM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a89d8764-940a-11e8-b5b0-0b43fd101631′]
नॅकचे मानांकन प्राप्त झालेल्या किन्हवली महाविद्यालयाच्या `डिजिटल इंडिया विद्यादीप` या वार्षिक अंकाचे प्रकाशन यावेळी त्यांच्या हस्ते झाले. आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा, मुरबाडचे आमदार किसन कथोरे,आदिवासी विभागीय प्रकल्पस्तरीय समितीचे अध्यक्ष अशोक इरनक,विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरविंद भानुशाली यांची यावेळी उपस्थिती होती.