GST On PG Hostel Rent | हॉस्टेल-पीजीमध्ये राहणाऱ्यांसाठी वाईट बातमी! आता भाड्यावर भरावा लागेल 12 टक्के जीएसटी

नवी दिल्ली : GST On PG Hostel Rent | हॉस्टेल किंवा पीजीमध्ये राहत असलेल्यांसाठी एक वाईट बातमी आहे. आता पीजी आणि हॉस्टेलच्या भाड्यासाठी जास्त शुल्क भरावे लागणार आहे. अ‍ॅथॉरिटी फॉर अ‍ॅडव्हान्स रुलिंग्स (AAR) ने दोन वेगवेगळ्या प्रकरणांची सुनावणी करताना हॉस्टेल्स आणि पीजीच्या भाड्यावर १२ टक्के जीएसटी (GST) लावण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांना आता जास्त पैसे मोजावे लागतील (GST on Rent of PG and Hostel).

AAR ने दिला हा निर्णय

AAR च्या बेंगळुरू खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी करताना सांगितले की, कोणताही रेसिडेन्सियल फ्लॅट किंवा घर आणि हॉस्टेल आणि पीजी एकसारखे नसतात. अशावेळी, हॉस्टेल्स आणि पीजी सारख्या कमर्शियल व्यवहार करणाऱ्या ठिकाणांना १२ टक्के गुड्स अँड सव्र्हिस टॅक्स (GST) भरणे बंधनकारक आहे. त्यांना जीएसटीमधून सूट देऊ नये. (GST On PG Hostel Rent)

श्रीसाई लक्झरी स्टे एलएलपीच्या अर्जावर, एएआरने म्हटले आहे की १७ जुलै २०२२ पर्यंत, बेंगळुरूमध्ये १,००० रुपयांपर्यंतच्या शुल्कापर्यंत हॉटेल्स, कॅम्पसाइट्स किंवा क्लबना जीएसटीमधून सूट मिळत होती, परंतु एएआरने म्हटले आहे की हॉस्टेल किंवा पीजी जीएसटीमधून सूट देण्यास पात्र नाहीत.

यासोबतच, खंडपीठाने म्हटले की, रेसिडेन्सियल प्रॉपर्टीज आणि पीजी हॉस्टेल एकसारखे नसतात. अशावेळी एकच नियम दोघांनाही लागू होऊ शकत नाही. यासोबतच या निर्णयात असेही म्हटले की, जर कोणी रेसिडेन्सियल प्रॉपर्टी गेस्ट हाऊस किंवा लॉज म्हणून वापरत असेल तर ते जीएसटीच्या कक्षेत येणार नाही.

नोएडामध्येही समोर आले प्रकरण

बेंगळुरू व्यतिरिक्त, नोएडाच्या व्हीएस इन्स्टिट्यूट अँड हॉस्टेल प्रायव्हेट लिमिटेडच्या
अर्जावर, लखनौ खंडपीठाने म्हटले की १,००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या
हॉस्टेलवर जीएसटी लागू होईल. हा नियम १८ जुलै २०२२ पासून लागू आहे.
विशेष म्हणजे, या निर्णयामुळे पीजी किंवा हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी
आणि नोकरदार यांच्या खिशावर भार पडणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Spices Price Hike | भाज्यांनंतर मसाले बिघडवणार चव! डबल डिजिटमध्ये वाढत आहेत किंमती,
जिऱ्याने मोडला विक्रम