GST | दुकानदारांसाठी महत्वाची बातमी! 31 डिसेंबरपूर्वी करा हे काम अन्यथा भरावा लागेल मोठा दंड

नवी दिल्ली : GST | ज्या व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी GSTR 9 फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. सरकारने 31 तारखेपूर्वी हा फॉर्म भरण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या सूचनेनुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात 2 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या करदात्यांना GSTR 9 फॉर्म भरणे आवश्यक आहे. मात्र, इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर, टीडीएस डिडक्टर, टीसीएस कलेक्टर, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आणि प्रवासी टॅक्सेबल पर्सन यांनी तो भरणे आवश्यक नाही. (GST)

सरकारने म्हटले की ज्या करदात्यांची वार्षिक उलाढाल 2021-22 साठी 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांनी GSTR 9 मध्ये वार्षिक रिटर्न भरण्याबरोबरच GSTR 9C मध्ये सेल्फ अ‍ॅटेस्टेड रिकॉन्सिलेशन स्टेटमेंट दाखल करणे देखील आवश्यक आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क बोर्डाने ही सूचना जारी केली आहे.

याचा महिन्यात मिळाला होता व्यावसायिकांना दिलासा
डिसेंबरच्या सुरुवातीला सरकारने GSTR 9C फॉर्मबाबत व्यावसायिकांना मोठा दिलासा दिला होता. 5 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेले व्यवसाय देखील GSTR 9C फॉर्म भरतात परंतु त्यांना चार्टर्ड अकाउंटंटकडून प्रमाणित करावे लागत होते. मात्र, सरकारने त्यात बदल केला असून व्यापारी स्वत: तो अटेस्ट करू शकतात. (GST)

काय आहे GSTR 9 फॉर्म
हा एक ऑडिट फॉर्म आहे जो 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना भरावा लागतो. त्याचप्रमाणे, 5 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यवसायांसाठी GSTR 9C फॉर्म आहे. यामध्ये व्यावसायिकाचे वार्षिक ऑडिटेट ग्रोस सकल आणि टॅक्सेबल टर्नओव्हर असतो. GSTR 9C 2 भागांमध्ये विभागलेला आहे, A आणि B. भाग A मध्ये कराबाबत सर्व माहिती असते आणि भाग बी मध्ये पडताळणी केली जाते जी पूर्वी सीएद्वारे केली जात होती. परंतु आता व्यावसायिक स्वतः करू शकतात.

फॉर्म न भरल्यास काय होईल?
जर करदात्याने हे फॉर्म भरले नाहीत, तर विलंबाच्या प्रत्येक दिवसासाठी 200 रुपये शुल्क आकारले जाते.
केंद्रीय जीएसटी अंतर्गत १०० रुपये आणि राज्य जीएसटी अंतर्गत 100 रुपये लागतात.
GSTR 9C उशीरा दाखल करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट दंडाची तरतुद नाही.
मात्र, जर करदात्याने वेळेत GSTR 9 भरून GSTR 9C भरण्यास उशीर केला,
तर त्याला 50000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. जीएसटी पोर्टलवर जाऊन तुम्ही ते भरू शकता.

Web Title :- GST | taxpayers with turnover more than 2 crore file gstr 9 gstr 9c before 31 december

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Punit Balan | पुनीत बालन यांची नवीन चित्रपटाची घोषणा; नाव ‘रानटी’, पण ‘रानटी’ कोण हे मात्र गुलदस्त्यात

Filmfare Awards | शिवकालीन युद्ध कलेवर आधारित माहितीपटाला यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त

Amruta Khanvilkar | अभिनेत्री अमृता खानविलकरच्या क्लासिक लुकने इंस्टाग्रामवर लावली ‘आग