भीमा कोरेगाव दंगलीतील पीडितांचे पालकमंत्र्याच्या ऑफिस समोर आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी झालेल्या दंगलीमधील पीडित आणि तिथे राहणारी पूजा सकट हिच्या हत्या प्रकरणी जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी. या सर्व मागण्यांसाठी रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांच्या नेतृतत्त्वाखाली आज पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या ऑफिस समोर आंदोलन केले.

यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे म्हणाले की,भीमा कोरेगाव येथील दंगलीची घटना होऊन महिन्याचा कालावधी झाला.मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची दोषींवर कारवाई या सरकारने केली नाही.ही निषेधार्थ बाब असून या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पीडितांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे.त्यामुळे त्यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा.अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

यावेळी पूजा सकट चे वडील सुरेश म्हणाले की,माझ्या मुलीची हत्या होऊन दोन महिन्याचा कालावधी होऊन गेला.मात्र त्यातील अद्याप ही आरोपी मोकाट आहेत.त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी.अशी मागणी त्यांनी केली.