पालकमंत्री गिरीश बापट यांचा स्थानिक नेत्यांना ‘सॅल्युट’

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी  चिंचवड आयुक्तालय 1 मे ला सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले होते. परंतु जागा निश्चित न झाल्याने आयुक्तालय सुरू झाले नाही. आयुक्तालयाची जागा निश्चित करण्यासाठी शनिवारी बैठक बोलावली होती. बैठकीला आलेल्या बापट यांनी स्थानिक नेत्यांना ‘स्यालुट’ मारला. या त्यांच्या कृत्यामुळे स्थानिक नेते मात्र बुचकळ्यात पडले. पालक मंत्री गिरीश बापट पिंपरीमध्ये आले होते.

पोलीस उपायुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीस आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार, पुणे शहराचे अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक, मुख्यालय उपायुक्त गायकर, परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलिस आयुक्त विक्रम पाटील, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरातील स्वतंत्र आयुक्तालया संदर्भाच्या बैठकीला बापट आले होते. यावेळी त्यांनी येताच क्षणी आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना चक्क ‘सॅल्युट’ मारला. पालकमंत्र्यांनी अचानकपणे केलेल्या अँक्शनमुळे आमदार जगताप आणि लांडगे दोघेंही गोंधळून गेले. तर उपस्थित असलेले देखील चक्राऊन गेले. नेमके कोणत्या कारणामुळे त्यांनी ‘स्यालुट’ मारला या मागे पालक मंत्र्यांचा काही वेगळा हेतू तर नव्हताना अशीच चर्चा उपस्थितांमध्ये होती.

पालकमंत्री गिरीश बापट यांचा स्थानिक नेत्यांना ‘सॅल्युट’

आयुक्तालय 15 ऑगस्टला सुरू होणार

1 मे चा मुहूर्त टळल्यानंतर आता 15 ऑगस्ट चा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. तशी गिरीश बापट यांनी माहिती दिलीय. तसेच आयुक्तालयासाठी लागणारे फर्निचर तसेच इतरही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी सर्वांनी हालचाल करणे गरजेचे आहे. या बैठकीचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार असून, कायदेशीर सर्व प्रक्रिया पूर्ण झल्यानंतर 15 ऑगस्टला आयुक्तालयाचे कामकाज सुरू करू असे बापट यांनी सांगितले.

इमारतीसाठी विरोध

आयुक्तालयासाठी निश्चित केलेल्या जागेची पाहणी करण्यात आली, परंतु निश्चित केलेली जागा ही एका शाळेची इमारत आहे. ही शाळा स्थलांतरित करून या ठिकाणी आयुक्तालय सुरू करण्यात येणार आहे. शाळा स्थलांतराचा शहरातील काही सामाजिक संस्थांचा विरोध आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट ला तरी आयुक्तालय सुरू होणार का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.