Facebook वर चुकूनही करु नका ‘हे’ काम, ब्लॉक होईल तुमचं अकाऊंट, जाणून घ्या
नवी दिल्लीः वृत्तसंस्था – जगात निम्म्याहून अधिक लोकसंख्या सध्या फेसबुकशी कनेक्ट आहे. सध्या लोक रोजच फेसबुकवर काहीनाकाहीतरी शेअर करत असतात. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर शेअर करू नयेत. अशा परिस्थितीत आपले खाते ब्लॉक होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला त्या गोष्टींबद्दल माहिती देणार आहोत. जे तुम्ही चुकूनही फेसबुरवर शेअर करु नये. असे केल्याने आपले फेसबुकवर कायमचे ब्लॉक केले जाऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर…
फेसबुकवर विना वैद्यकीय औषधांपासून ते गांजा खरेदी-विक्रीवर बंदी आहे. तसेच दारूगोळा, बंदूक खरेदी-विक्रीवर देखील बंदी आहे. अशा परिस्थितीत आपण या गोष्टींशी संबंधित एखादे पोस्ट शेअर केल्यास आपले खाते त्वरित ब्लॉक केले जाऊ शकते.
हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे किंवा कोणालाही धमकी देणारे पोस्ट शेअर करू नका
एखाद्या व्यक्तीने, समुहावर किंवा जागेवर हिंसाचार करण्याच्या हेतूने वक्तव्य शेअर केले त्याचबरोबर फेसबुकवर कोणाला धमकी दिली तर फेसबुक ताबडतोब त्या युजर्सचे फेसबुक अकाऊंट ब्लॉक करु शकते. तसेच, फेसबुकच्या व्यासपीठावर कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारे धमकावले जाऊ शकत नाही. तसेच पैशांची मागणी करणे किंवा एखाद्या विशिष्ट शस्त्राचा उल्लेख करणे किंवा फोटो किंवा शस्त्राची विक्री करण्याची ऑफर देणे. अशी पोस्ट हटवण्यासोबतच युजर्सचे खाते त्वरित ब्लॉक केले जाते.
विनाकारण कोणाला पोक (poke) करु नका
जर तुम्हाला विनाकारण लोकांना पोक करण्याची आवड असेल तर लक्षात ठेवा की आपले प्रोफाइल याद्वारे ब्लॉक केले जाऊ शकते.
आतंकवादी संघटना
फेसबुकवर आतंकवादी संघटना संघटित केल्या जातात आणि त्यासह द्वेष पसरविले जातात, तसेच सामूहिक किंवा हळूहळू हत्या, मानवी तस्करी, संघटित हिंसा किंवा गुन्हेगारी क्रिया यासारख्या दुर्भावनायुक्त कृत्ये केले जातात. राजकारणी किंवा लोकांचे समर्थन आणि कौतुक दर्शविणार्या या सर्व गोष्टी फेसबुक पूर्णपणे काढून टाकते. या व्यतिरिक्त, कोणतीही राजकीय, धार्मिक किंवा सैद्धांतिक ध्येय गाठण्यासाठी किंवा कोणत्याही सरकारी किंवा आंतरराष्ट्रीय संघटनेला धमकावणाऱ्या किंवा हिंसक कार्यात सामिल असलेल्या सर्व गोष्टी फेसबुक ब्लॉक करुन टाकते आणि पुर्णपणे याला आपल्या अॅपमधून हटवून टाकते.