‘नणंद – भावजयी’ कडून 13 तासात 53 KM उलटया दिशेनं धावण्याचा ‘रेकॉर्ड’, गिनीज बुकमध्ये ‘एन्ट्री’ झाल्याचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातमध्ये बारडोलीमध्ये राहणाऱ्या 2 महिलांनी मागे उलट्या दिशेने धावण्याचा रेकॉर्ड केला. या मुली आहेत ट्विंकल ठाकर आणि स्वाति ठाकर. यांनी 13 तासात 53 किलोमीटर मागे उलट धावण्याचा रेकॉर्ड केला. ज्यानंतर त्यांचे नाव गिनिज बुक ऑफ द रेकॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. या दोघींनी पंतप्रधान मोदींची आपल्या प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदींच्या महिला सशक्तीकरणाच्या संदेशाने त्यांनी प्रेरित होऊन आपल्या कौशल्याच्या जोरावर हे रेकॉर्ड केले. यामुळे इतर महिलांना देखील प्रोस्ताहन मिळाले आहे.

गुजरातच्या नणंद-भावजय उलट्या दिशेने धावल्या –
ट्विंकल ठाकर आणि स्वाति ठाकर यांनी महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता बारडोलीपासून आपल्या धावण्यास सुरुवात केली. ज्यानंतर पुढे दिवस रात्री धावून त्यांची धाव दांडीमध्ये संपली. या दोघी नणंद-भावजय आहेत. त्यांनी आपल्या धावतानाचा व्हिडिओ संबंधित विभागात पाठवला.



काय करतात ट्विंकल ठाकर आणि स्वाति ठाकर –

ग्रेटेस्ट डिस्टेंस कवर्ड बाय बॅकवर्ड रनिंग इन 24 आवर्स या अंतर्गत दोघींनी उलट्या दिशेने धावून रेकॉर्ड बनवला. स्वाति बारडोलीच्या केन टेकवानडू नावाच्या संस्थेत संस्थापक आहेत, तर ट्विंकल ठाकर धूमकेतु डान्स अकॅडमीशी जोडलेल्या आहेत. त्या म्हणाल्या की नारी शक्तीला उजागर करण्याच्या उद्देशाने आम्ही हा रेकॉर्ड करण्यासाठी तयार झालो.



घरच्यांनी दिला आत्मविश्वास –

ट्विंकल ठाकर यांनी सांगितले की पहिल्यांना आम्ही अशा रेससाठी तयार नव्हतो, परंतू कुटूंबियांना आम्हाला प्रोस्ताहन दिले. आता आमचा उद्देश महिलांना त्यांच्या कौशल्याचे प्रदर्शन देण्यासाठी प्रेरित करणे, कारण प्रत्येकात काहीतरी खास गुण असतात परंतू यासाठी आपल्याला आवश्यक असतो तो पाठिंबा.

Visit : Policenama.com