राहुल गांधींविरोधात गुजरातमधील बँकेचा अब्रुनुकसानीचा दावा

अहमदाबाद : वृत्तसंस्था

भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेने नोटाबंदीच्या काळात संशयास्पद पद्धतीने मोठ्याप्रमाणात जुन्या नोटा बदलल्याचा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केला होता. हा आरोप भाजपच्या जिव्हारी लागला होता. आता या घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेने (एडीसीबी) राहुल गांधी आणि सुरजेवाला यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a87ef7c6-aa7c-11e8-86e3-257f3f628901′]

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधताना राहुल यांनी २२ जून रोजी ट्विट करून हा आरोप केला होता. तुम्ही संचालक असलेल्या अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेने नोटाबंदीनंतर पहिल्या पाच दिवसात ७५० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलल्या होत्या. त्या बँकेला पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नोटाबंदीमुळे हजारो लोक लोकांचे आयुष्य बरबाद झाले. तुमच्या या यशस्वी कार्याला सलाम, अशी टीका राहुल यांनी शहा यांच्यावर केली होती.

नोटाबंदीच्या काळात पाच दिवसात या बँकेने ७५० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलल्याचा आरोप राहुल गांधी आणि सुरजेवाला या दोघांनी केला होता. सहकारी बँक आणि या बँकेचे अध्यक्ष अजय पटेल यांनी अहमदाबाद महानगर दंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यात या दोन्ही नेत्यांनी बँकेवर खोटे आरोप केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणावर येत्या १७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, नोटाबंदीनंतर मुंबईतील एका आरटीआय कार्यकर्त्याने नाबार्डमधून माहितीच्या अधिकारातून माहिती मागवली होती. त्यानंतर राहुल आणि सुरजेवाला यांनी हे आरोप केले होते. अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत नोटाबंदीच्या काळात ७४५ कोटींपेक्षा अधिक रक्कम बदलल्या गेल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच रद्द केली आहे.

सिंहगड रोडवरील स्वागत लॉज मधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश