Tik Tok व्हिडीओमुळं पोलिस कर्मचार्‍याला निलंबीत केलं, आता महिला पोलिस अधीक्षकांचाच (SP) व्हिडीओ व्हायरल

राजकोट : वृत्तसंस्था – गुजरातमध्ये एका २४ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलला पोलीस ठाण्यात TikTok व्हिडिओ केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. हे प्रकरण ताजे असतानाच या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अहमदाबादच्या महिला पोलीस अधीक्षक मंजीता वंजारा यांचा TikTok व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ३० वर्षीय महिला पोलीस अधीक्षक त्यांच्या मैत्रिणीसोबत डान्स करताना दिसत आहेत.

महिला पोलीस अधीक्षक मंजीता वंजारा यांच्या म्हणण्यानुसार २४ वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबल अल्पिता चौधरीला TikTok व्हिडिओ केल्याबद्दल निलंबित करण्यात आले नाही. तर त्या महिला कॉन्स्टेबलने गणवेश परिधान केला नसल्याने निलंबित करण्यात आले आहे. तसेच अल्पिता चौधरी या महिला कॉन्स्टेबलने पोलीस ठाण्यामध्ये TikTok व्हिडिओ बनवला होता.

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, TikTok व्हिडिओच्या प्रकरणातून बचाव करण्यासाठी महिला पोलीस अधीक्षक वंजारा यांनी पोलिसांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना सोशल मीडियावर असणे आवश्यक आहे, आणि त्यांना हक्क देखील आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ आपण व्हायरल केलेला नाही तर मैत्रिणीने तिच्या अकाऊंटवरून व्हिडिओ व्हायरल केला आहे. मला कुचिपुडी आणि स्वयंपाकाची आवड आहे. ड्युटी संपल्यानंतर घरामध्ये आपल्याला ही कामे करायला आवडतात, असे सांगितले. दरम्यान, अल्पिता यांनी आपल्याला चुकीच्या कारणामुळे शिक्षा दिली असल्याचे म्हटले आहे.

अहमदाबाद आणि वडोदरा पोलीस प्रमुखांनी सांगितले की, पोलीस अधिकारी असोत किंवा पोलीस कर्मचारी यांनी गणवेशात असताना अशा प्रकारचे कृत्य करणे चुकीचे आहे. तसेच ते कायद्याला धरून नाही. अशा प्रकारचे कृत्य करताना आढळून आल्यास त्याच्यावर कादेशीर कारवाई करण्यात येते. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.

आरोग्यविषयक वृत्त –