Gulabrao Patil | मंत्री गुलाबराव पाटलांचा शिक्षकांना वादग्रस्त सल्ला; म्हणाले – ‘मराठी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी पक्षाप्रमाणे इंग्रजी शाळांचे विद्यार्थी फोडा’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड केल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. तर त्यांच्यासोबत गेलेले आमदार (MLA) मंत्री झाले. आता शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार सर्वच ठिकाणी फोडाफोडीची भाषा करताना पहायला मिळत आहेत. शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिक्षक दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात विद्यार्थ्यासमोर फोडाफोडीची भाषा केली आहे. मराठी माध्यमाच्या शाळांची (Marathi Medium School) पटसंख्या वाढवायची असेल, तर ज्याप्रमाणे पक्षाचे लोक फोडले जातात, तसं इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे (English Medium School) विद्यार्थी फोडा, असे वादग्रस्त वक्तव्य गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलं आहे.

 

शिक्षक दिनानिमित्त जळगाव जिल्हा शिक्षक पुरस्कार (District Teacher Award) वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे प्रमुख अथिती म्हणून उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांनी शिक्षकांना वादग्रस्त सल्ला दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गुलाबराव पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

गुलाबराव पाटील यांनी भ्रष्टाचाराबाबत (Corruption) देखील एक धक्कादायक विधान केले. आज काल कोण करप्ट नाही, आज सगळी दुनिया करप्ट आहे, असे विधान त्यांनी केले. या देशात एकमेव नॉन करप्ट प्राणी म्हणजे शिक्षक आहे. आमच्यावरही आरोप चाललेत, सब कुछ ओके आणि 50 खोके असंही पाटील म्हणाले.

 

Advt.

दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील (NCP MLA Anil Patil)
यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षातील लोकांना फोडणे,
हे फोडाफोडीचे राजकारण राजकीय पक्षांपर्यंत ठीक आहे, त्याला विद्यार्थ्यांपर्यंत आणणं चुकीचं आहे.
विद्यार्थ्यांमध्ये हे दुर्गुण यायला नको, याची दक्षता आपण घेतली पाहिजे, असे अनिल पाटील म्हणाले.

 

Web Title :- Gulabrao Patil | gulabrao patil controversial suggestion to increase number of marathi school on teachers day

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा