Pune PMC News | सुविधा हव्यात तर जास्तीचा मिळकत कराची तयारी ठेवावी लागणार; प्राथमिक सर्वेक्षणात कॅपिटल टॅक्समधून दुप्पट उत्पन्न मिळण्याचा अंदाज

 

कॅपिटल टॅक्ससाठी आता क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत सर्वेक्षण सुरू

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | सुविधांच्या (ऍमेनिटी) Amenities आधारावर सदनिकांच्या किंमतीवर मिळकतकराची आकारणी PMC Property Tax (Capital Tax) करण्याची चाचपणी महापालिकेच्यावतीने सुरू आहे. याची अंमलबजावणी सुरू झाल्यास जेवढी अलिशान सदनिका तितकाच अधिक मिळकत कर भरावा लागणार आहे. महापालिकेने गोखले इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने पहिल्यांदा १०० घरांसाठी सर्वेक्षण केले असून पुढील टप्प्यात एका संपुर्ण क्षेत्रिय कार्यालयाच्या आवारातील मिळकतींचे सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar) यांनी दिली. (Pune PMC News)

 

 

 

महापालिका सध्या रेडिरेकनरच्या दरानुसार मिळकतकराची आकारणी करते. मात्र यामुळे कोणत्याही सुविधा नसलेल्या मिळकती आणि आलिशान सोसायटीमध्ये महागड्या किंमतींना खरेदी केलेल्या सदनिकांना समानच मिळकतकराची आकारणी होते. साध्या सोसायटीमध्ये ५०० चौरस फुटांचा सदनिकेची किंमत २० लाख असल्यास मोठ्या गृहप्रकल्पांमध्ये सर्व सोयीयुक्त ४० लाख असते. त्यामुळे आकारणीमधील असमानता टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून सदनिकेच्या किंमतीवर मिळकत कर आकारण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी गोखले इस्न्टिट्यूटच्या सहकार्याने सर्वेक्षण करत आहे. (Pune PMC News)

यासंदर्भातील सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर १०० मिळकतींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. याचा अहवाल महापालिकेला मिळाला आहे. महापालिकेकडे यापुर्वी नोंदवलेल्या या १०० मिळकतीजागेवर जावून कराची आकारणी केल्यास क्षेत्र आणि सुविधांची अतिरिक्त माहीती मिळाली आहे. कॅपिटल टॅक्सनुसार आकारणी केल्यास या मिळकतींकडून सध्यापेक्षा दुप्पट कर आकारणी होउ शकते, असे या अहवालात समोर आले आहे. यामुळेच पुढील सर्वेक्षण एका संपुर्ण क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीमध्ये करण्यात येणार आहे. साधारण प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयात सरासरी ८० हजार मिळकती आहेत. यामध्ये अगदी सर्वसामान्य छोट्या मिळकतींपासून अलिशान मिळकतींचा समावेश आहे, अशी माहिती विक्रम कुमार यांनी दिली.

 

याविषयी महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, शहरामध्ये अनेक प्रकारचे गृहप्रकल्प आहेत. यामध्ये अनेक प्रकारचे सोयी सुविधा, यामध्ये जलतरण तलाव, व्यायामशाळा, चित्रपटगृह, हॉटेल, क्रीडांगण, मनोरंजन केंद्र, अशा सुविधा असणार्या सोसायट्या आहेत. तर काही ठिकाणी सुविधा नसलेल्या सोसायट्या आहेत. विविध ऍमेनिटीज पुरविणार्‍या सोासयट्यांमध्ये सदस्यांकडून मेन्टेंनन्स आकारणीही मोठ्या प्रमाणात होत असते. त्यातुलनेत छोट्या सोसायट्यांमध्ये मेन्टेनन्स कमी असल्याचेही समोर आले आहे. क्षेत्रिय कार्यालय स्तरावरील अहवाल आल्यानंतर कॅपिटल टॅक्स आकारणी प्रकरणी राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतरच आकारणी केली जाणार आहे.

 

सर्वसाधारण कराबाबत दिलासा

राज्य शासनाच्या आदेशानुसार मूळ मिळकत धारकाला सर्वसाधारण करामध्ये देण्यात येणारी ४० टक्के सूट २०१९ पासून रद्द करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी यंदाच्या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात आल्याने अनेक मिळकत धारकांना अधिक रकमेची बिले आल्याने महापालिकेला रोषाला सामोरे जावे लागले आहे.
या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने तूर्तास यापुर्वीप्रमाणेच कराची रक्कम भरावी व
सर्वसाधारण करातील सूट रद्द केल्याने वाढलेली रक्कम भरू नये,
असा दिलासा नागरिकांना दिला आहे.
परंतू सप्टेंबरनंतर थकीत करावर दोन टक्के दंड आकारण्यात येतो.
यामुळे हा दंड भरावा लागणार? अशीही शंका नागरिकांच्या मनामध्ये आहे.
याबद्दल बोलताना विक्रम कुमार यांनी सांगितले, की वाढीव कर भरू नये असे नागरिकांना आवाहन करण्यात
आल्याने त्यावर दंड लावणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

 

Web Title :- Pune PMC News | If facilities are required, additional income tax should be prepared;
Preliminary survey predicts doubling revenue from capital tax

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा