Gulabrao Patil | ‘यावेळी आमचे 40 रेडे जातायेत, दर्शन घ्यायला. पण मी जाणार नाही’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन- ‘मला समजले आहे की, त्यांनी तेथील हॉटेल मालकाचे बिल दिले नाही, त्यामुळे हॉटेल मालकाने आत्महत्या केली. अशी प्रसार माध्यमांमध्ये चर्चा होत आहे. ते दर्शनाला चालले आहेत. लोक नवस फेडायला जात असतात. तेथे रेडा बळी देतात. आता ते कोणाचा बळी द्यायला चाललेत. दर्शनाला जाणार असतील, तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.’ असे म्हणत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. आता याच टीकेचा आधार घेत शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी ते गुवाहाटीला जाणार नसल्याची माहिती दिली आहे. जळगाव दूधसंघाच्या निवडणुकांची तयारी करत असल्या कारणाने त्यांना कामख्या देवीच्या दर्शनाला जात येणार नसल्याचे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी स्पष्ट केले.

 

भाजप शिंदे गटाचा जिल्हा दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) बोलत होते. ‘आमच्यातील सर्वच आमदार जात आहेत. पण मला जाता येणार नाही. निवडणूक असल्याने मी मुख्यमंत्री शिंदे यांना तशी विनंती केली आहे. ज्यादिवशी आम्ही इकडं येऊ तेव्हा २७ ची रात्र असेल. मग २८ ला आम्हाला मतदारसंघात यावं लागेल. त्यादिवशी निवडणुकीची उमेदवारी माघारी घेण्याचा दिवस आहे. आपला एकतरी प्रतिनिधी असावा यासाठी मी ही विनंती केली. पण आमचे बाकीचे आमदार निश्चितपणे जाणार आहेत. यावेळी आमचे ४० रेडे जातायेत. दर्शन घ्यायचं आहे.’ असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे त्यांच्या आमदारांसह गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे,
असा नवस कामाख्या देवीला केला होता.
हा नवस पूर्ण झाल्याने हा नवस फेडण्यासाठी एकनाथ शिंदे त्यांच्या आमदार खासदारांसह कामख्या देवीचे
आशीर्वाद घेण्यासाठी पुन्हा गुवाहाटीला जात असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली होती.
त्यानंतर महाराष्ट्रात राज्यपाल आणि कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे वाद सुरु झाला.
त्यामुळे अजित पवारांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली होती.

 

Web Title :- Gulabrao Patil | gulabrao patil on cm eknath shinde group guwahati tour jalgaon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | मारणे गँगची भिती दाखवून बिल्डरकडे खंडणीची मागणी, सराईत गुन्हेगार राकेश मारणेवर FIR

Jitendra Awhad On Ramdev Baba | ‘रामदेव बाबांच्या मनात आणि नजरेत विकृती भरलीय’ – जितेंद्र आव्हाड

Washim ACB Trap | शिवभोजन थाळीची थकीत रक्कम मिळण्यासाठी मागितली लाच; पुरवठा विभागाचा निरीक्षण अधिकारी एसीबीच्या ताब्यात