‘या’ कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना मिळतो त्वरित अमेरिकन ‘VISA’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अमेरिकी कामगार मंत्रालयाने नुकतीच कर्मचाऱ्यांना सर्वात जास्त व्हिजा दिल्या गेलेल्या कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. अमेरिकेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न जगातील तरुण पाहत असतात. परंतु येथील व्हिसा मिळणे काहीसे खडतर असल्यामुळे अनेकांच्या स्वप्नांवर पाणी फिरते. येथे व्हिजा मिळविण्यासाठी अनेक सरकारी कार्यालयांची परवानगी मिळवावी लागते आणि सर्वाधिक अडचण येते ती कामगार विभागाची परवानगी मिळण्यास. परंतु याच विभागाने आता अशा प्रसिद्ध कंपन्यांची यादी जाहीर केलीय ज्यांतील सर्वाधिक कर्मचाऱ्यांना अमेरिकन H-1B व्हिजा मिळालेला आहे. या कंपन्या पुढीलप्रमाणे :

अ‍ॅपल
स्टीव्ह जॉब्झ द्वारे स्थापित हि एक जागतिक कंपनी आहे. या कंपनीचा कारभार संपूर्ण जगभरात पसरलेला असून मोठ्या प्रमाणात भारतीय या कंपनीत काम करतात. मोबाईल तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये हि कंपनी अग्रेसर मानली जाते. अमेरिकेत काम करण्यासाठी आवश्यक असणारा व्हिजा या कंपनीच्या मदतीने कर्मचाऱ्यांना सहजतेने मिळू शकतो.

विप्रो
हि भारतीय सॉफ्टवेअर कंपनी असून प्रदेशात देखील कामकाज करते. आपल्या विदेशी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना हि कंपनी अमेरिकन व्हिजा मिळवून देते.

टीसीएस
या भारतीय कंपनी चा व्यापार अमेरिकेसहित आखाती देशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. अमेरिकेमध्ये जाणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना हि कंपनी व्हिजा मिळवून देते.

इन्फोसिस
सॉफ्टवेअर क्षेत्रातील अग्रेसर असणारी हि भारतीय कंपनी संपूर्ण जगभरात आपल्या ग्राहकांना सेवा पुरविण्यासाठी भारतातील कर्मचारी पाठवत असते.या कर्मचाऱ्यांच्या व्हिजाचीही सोय हि कंपनी करते.

ऍमेझॉन
ऑनलाईन वस्तूंच्या खरेदी विक्रीची सेवा पुरविणारी हि जगातील एक अग्रगण्य कंपनी आहे. अमेरिका, भारतासहित अनेक देशांमध्ये हि कंपनी सेवा पुरविते. अमेरिकेत जाणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना हि कंपनी सहजतेने व्हिजा मिळवून देते.

कॉग्निझंट टेकनॉलॉजी
या सॉफ्टवेअर कंपनी च्या भारतात मोठ्या प्रमाणावर शाखा असून संपूर्ण देशभरात भारतीय कर्मचारी मोठ्या प्रमाणावर या कंपनीमध्ये काम करतात. भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना व्हिजा मिळविताना अडचणी येऊ नयेत याकडे हि कंपनी लक्ष पुरविते.

क्वालकॉम
टेली कम्यूनिकेशन च साहित्य बनविणारी हि कंपनी अनेक देशांमध्ये काम करते. आपल्या अमेरिकेमध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना H-1B व्हिजा हि कंपनी मिळवून देते.