‘पॉप सिंगर’ जस्टीन बीबरच्या पत्नीची पार्टीत ‘चर्चा’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पॉप सिंगर आणि फेमस स्टार जस्टिन बीबरची पत्नी हॅली बाल्डविन बीबर आपल्या फोटोमुळे आणि व्हिडीओमुळे सध्या सोशलवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. हॅली नेहमीच आपल्या पती सोबत आणि मैत्रिणींसोबत हँगआऊट करताना दिसत असते. हॅली सोशलवर कायमच सक्रिय असते.

चाहत्यांसोबत हॉट फोटो शेअर करायला हॅलीला खूप आवडतं. चाहत्यांनाही हॅलीची टोन्ड फिगर खूप आवडते. चाहतेही तिच्या टोन्ड फिगरचे फोटो पाहण्यासाठी वाट पहात असतात. नुकतीच हॅली व्हॅनिटी फेअर ऑस्कर पार्टीत आली होती. यावेळी आपल्या लुकनं तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

23 वर्षीय हॅलीनं ब्लॅक साईड कट ड्रेस घातला होता. या थाय स्लिट ड्रेसमध्ये हॅली खूपच बोल्ड दिसत होती. यावेळी हॅलीनं आपले हॉट लेग्स फ्लाँट केले. हॅलीच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं मिनिमल मेकअफ, न्यूड लिपस्टिक आणि शॉर्ट हेअर करत तिनं आपला लुक कम्प्लीट केला होता. सध्या हॅलीचे थाय स्लिट ड्रेसमधील काही फोटो आणि व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

जस्टिन बीबरनं 13 सप्टेंबर 2018 मध्ये हॅलीसोबत कोर्ट मॅरेज केलं होतं. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी मात्र या कपलनं पूर्ण रिती रिवाजासोबत लग्न केलं होतं. दोघांच्या प्रायव्हेट वेडिंगचे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले होते.

https://www.instagram.com/p/B8Yl2QsCMOK/