Hair Care Tips | केसगळतीवर करा नैसर्गिक उपाय, ‘हे’ योगासन आहेत केसांच्या वाढीसाठी उपयुक्त…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Hair Care Tips | महिलांचे सौंदर्य हे त्यांच्या केसांमध्ये असतं (Hair Care Tips). अनेक महिला आपल्या केसांच्या समस्यांमुळे त्रस्त असतात. रूक्ष केसांमुळे त्यांच्यातील आत्मविश्वास कमी होतो (Yoga For Hair Growth).

 

उन्हाळ्यामध्ये केसांची निगा राखणे (Hair Care) अत्यंत गरजेचं असते. अनेक महिलांना उन्हाळ्यामध्ये केसांच्या (Hair Care Tips) अनेक समस्या उद्भवतात (Summer Hair Care). जाणून घेऊयात काही योगासने ज्यामुळे आपल्याला नैसर्गिकरित्या केसगळती (Hair Fall) पासून सुटका देखील मिळेल (These Yoga Asanas Are Helpful In Hair Growth Hair Fall Will Be Reduced Naturally).

 

वज्रासन (Vajrasana) –
वज्रासन तुमच्या शरीरात पोषक तत्वांनी युक्त रक्तप्रवाहाला प्रोत्साहन देते. वज्रासनामुळे स्कॅल्पच्या विविध संसर्गाची लढण्यासाठी तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती देखील सुधारते. जेवल्यानंतर लगेच वज्रासन करता येतं. यासाठी जमिनीवर गुडघे टेकून मांड्या जवळ करून बसा. पाठीचा कणा सरळ ठेवा आणि वरच्या मांडीवर हात ठेवा. दीर्घ श्वास घ्या व सोडा.

 

उष्ट्रासन (Ustrasana) –
तुमचे केस खूप तुटत असतील (Hair Fall Problems), तर तुम्ही उष्ट्रासन करावं. हे करण्यासाठी गुडघे जमिनीवर टेकवा आणि तुमचे हात टाचांना स्पर्श करेपर्यंत पाठीचा कणा वाकवा. आपल्याला या स्थितीत काही सेकंद राहण्याची आवश्यकता आहे. तुमचा श्वास सामान्य ठेवा गुडघे स्थितीत परत येताना, आपला श्वास सोडणे आवश्यक आहे.

पवनमुक्तासन (Pavanamuktasana) –
पचनक्रिया सुधारण्या सोबतच केसांच्या वाढीसाठी पवनमुक्तासन हे उत्तम योगासन आहे. हे करण्यासाठी आपल्याला पाठीवर झोपनं आवश्यक आहे. सर्वप्रथम पाठीवर झोपा आणि आपले गुडघे छातीकडे आणा. जेव्हा गुडघे जवळ येतील तेव्हा श्वास सोडा आणि नॉर्मल पोझिशनमध्ये या.

 

सर्वांगासन (Sarvangasana) –
सर्वांगासन करण्यासाठी पाठीवर झोपा आणि पायाची बोटे छातीकडे जाईपर्यंत पाय वर करा.
आपले डोके, मान आणि पाठीवरचा भाग वापरून आपल्या शरीरला संतुलित करा,
असं केल्याने स्कॅल्पमध्ये रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते आणि केसांच्या मुळांचे पोषण होते. ज्यामुळे केस गळणे टळण्यास मदत होते.

 

शीर्षासन (Sirsasana) –
शीर्षासन करण्यासाठी संपूर्ण शरीर डोक्यावर संतुलन ठेवावे लागते.
हे करण्यासाठी भिंतीच्या मदतीने तुमचे डोके जमिनीवर ठेवा आणि तुमचे शरीर उलटे करा.
सर्वप्रथम हे करताना तुम्हाला एका भिंतीचा आधार घ्यावा लागेल. परंतु नंतर हळूहळू सवय होईल.
हे आसन केल्यानं केसांच्या वाढीला प्रोत्साहन मिळते. कारण तुमच्या केसांच्या मुळांना आवश्यक पोषक तत्त्वांचा पुरवठा करण्यास या आसनामुळे मदत होते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Hair Care Tips | yoga for hair growth these yogasanas are helpful in hair growth hairfall will be reduced naturally

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Home Remedies For Dark Underarms | तुम्ही देखील काळ्या अंडरआर्म्समुळं स्लिव्हलेस घालत नसाल, तर करून पाहा ‘हे’ घरगुती उपाय

 

Malaria | फुफ्फुस-लिव्हर वाईट प्रकारे डॅमेज करू शकतो मलेरिया, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

 

Breastfeeding Mother Diet | स्तनपान देणाऱ्या महिलांनी ‘ही’ फळे आवर्जुन खावी, फायदा ऐकून तुम्हीही होताल थक्क…