Hair Care – Vitamin Deficiency | कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे केस होतात पातळ? ‘या’ 3 घरगुती उपायांनी केस होतील दाट…

पोलीसनामा ऑनलाईन टीम | केसांच्या वाढीसाठी आणि देखभालीसाठी व्हिटॅमिन ए अत्यंत आवश्यक आहे (Hair Care – Vitamin Deficiency). त्याच्या कमतरतेमुळे केस गळणे (Hair Fall), पातळ होणे (Thin Hair) आणि कोंडा (Dandruff) होऊ लागतो. व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे केस गळणे, पातळ होणे आणि पांढरे होऊ शकतात. केसांच्या वाढीसाठी (Hair Growth) आणि कोलेजन (Collagen) उत्पादनासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. व्हिटॅमिन ई केसांना सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवण्यास मदत करते. व्हिटॅमिन ईच्या आपल्या केस आणि चेहऱ्यासाठी अत्यंत गरजेच असत. लोहाच्या कमतरतेमुळे (Iron Deficiency) सुद्धा केस गळतात. तसेच केस पातळ होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात (Hair Care – Vitamin Deficiency).

दाट केसांसाठी घरगुती उपाय (Home Remedies For Thick Hair)

खोबरेल तेल (Coconut Hair Oil)

खोबरेल तेल केसांसाठी उत्कृष्ट मानले जाते (Good For Hair). खोबरेल तेलामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई असतात, जे केसांच्या वाढीसाठी आणि मजबूतीसाठी आवश्यक असतात. खोबरेल तेल गरम करून केसांना लावा आणि 1 तासानंतर केस धुवा.

कांद्याचा रस (Onion Juice)

कांद्याचा रस केसांच्या वाढीसाठी प्रभावी उपाय आहे (Onion Juice For Hair Growth). कांद्याच्या रसामध्ये सल्फर असते, जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते. कांद्याचा रस केसांना लावा आणि ३० मिनिटांनी केस धुवा.

अंडी (Egg)

अंडी हे केसांसाठीही उत्तम पोषण आहे.
अंड्यांमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी 12 असतात,
जे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असतात (Hair Care – Vitamin Deficiency).
केसांना अंडी लावा आणि 30 मिनिटांनी धुवा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीची आत्महत्या, मंगळवार पेठेतील घटना; पतीवर FIR

सनफ्लॅग कंपनीतील भीषण स्फोटाने भंडारा हादरला; ८ कामगार जखमी, तिघांची प्रकृती गंभीर