#YogaDay2019 : स्मरणशक्‍ती वाढवायचीय मग ‘ही’ आसने नक्‍की करा

पोलीसनामा ऑनलाईन – सध्या धावपळीच्या युगात प्रत्येकजण आपल्या कामामध्ये व्यस्त आहे. प्रत्येक व्यक्ती आपआपल्या कामात यश मिळविण्यासाठी धडपडत असतो. कारण आज प्रत्येक गोष्टीत स्पर्धा आहे. त्यामुळे सगळेच आपल्या कामामध्ये लक्ष देऊन परिश्रम घेत आहे. आपल्याला तर माहितच आहे की, अथक प्रयत्नामुळे यश प्राप्त होते. पण त्यासाठी तुम्ही हुशार हवे. कारण आपण जर बुद्धीने काम केले तरच पुढे जातो. त्यासाठी आपली स्मरणशक्ती मजबूत असायली हवी.

स्मरणशक्ती वाढविण्यासाठी आपल्याला काही गोष्टी केल्या पाहिजे. कारण या स्पर्धात्मक युगात जो हुशार आहे तोच पुढे जाणार. त्यामुळे आपल्या यशामध्ये स्मरणशक्तीचा मोलाचा वाटा आहे. ज्या व्यक्तीमध्ये जिद्द, चिकाटी आणि स्मरणशक्ती मजबूत असते तो कधीच मागे पडत नाही. अनेक लोक स्मरणशक्ती वाढविण्यासाठी काहीनकाहीतरी खात असतात. पण त्याचबरोबर यासाठी काही आसन करणे गरजेचे आहे.

स्मरणशक्ती वाढविण्यासाठी कोणती आसने केली पाहिजे ? हे देखील माहित असणे गरजेचे आहे. यामध्ये पद्मासन, ध्यान मुद्रासन, शीर्षासन, सर्वांगासन ही आसने स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करतात. पण ही आसने कशी करायला हवी हे देखील माहित असणे तितकेच महत्वाचे आहे. हे आसन कसे करावे याची आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

१. पद्मासन

हे आसन बसून केले जाते. आधी लांब पाय करुन बसा. अजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा धरुन डाव्या पायाला उजव्या पायाच्या जांघेवर ठेवा. नंतर उजवा पाय डाव्या जांघेवर ठेवा. दोन्ही हाताचे पंजे गुडघ्यावर सरळ ठेवा. दोन्ही हाताच्या अंगठ्याजवळील बोट अंगठ्यावर ठेवा. बाकी तिन्ही बोट सरळ ठेवा. डोळें बंद करा. पाठ ताठ ठेवून बसा.

२. ध्यान मुद्रासन

ध्यान ही एक अशी शक्ती आहे की जी आपल्याला गुलामी आणि प्रकृती या सर्वांचा प्रतिकार करण्यास समर्थ करते. त्यामुळे डोळे मिटून मन एकाग्र करुन शांत बसा आणि सकारात्मक विचार करा.

३. शीर्षासन

हे आसन म्हणजे डोके खाली आणि पाय वर अशा अवस्थेत जमिनीवर डोके टेकवून डोक्यात सारा भार टाकून उलटे उभे राहणे. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह डोक्याकडे म्हणजे मेंदूकडे वहायला लागतो. मेंदूला रक्तपुरवठा होतो. मेंदू हा सर्वात प्रमुख अवयव आहे. शरीरातील कोणत्याही अवयवाचे काम मेंदूकडे नियंत्रित केले जातात. मेंदू सजेत झाल्याने आपण चांगल्या पद्धतीने काम करु लागतो.

४. सर्वांगासन

पाठिच्या आधारे सरळ झोपावे. दोन्ही पाय सरळ पुढे पसरवून दोन्ही हात बरलेत ठेवावेत. श्वास आत घेऊन गरजेनुसार हाताच्या मदतीने पायांना हळू-हळू ३० डिग्री, नग ६० डिग्री आणि शेवटी ९० डिग्री पर्यंत उचलावे. ९० डिग्रीवर जर सरळ पाय होत नसेल तर १२० डिग्रीपर्यंत पायांना वर उचलावे व हातांना कमरेपर्यंत मागे घेऊन जावे. या क्रियेनंतर पायांना सरळ ठेवून मागे थोडे वाकावे. याउलट हळू-हळू आधी पाठ आणि मग पायांना जमिनीवर सरळ करावे. जितका वेळ सर्वांगासन केले जाते तेवढ्याच वेळेपर्यंत शवासनमध्ये विश्राम करावा.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन