Hanuma Vihari | टीम इंडियाने दुर्लक्षित केलेल्या हनुमा विहारीची आफ्रिकेत ‘कमाल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Hanuma Vihari | भारत ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए (India A vs South Africa A) यांच्यातील दुसरी अनधिकृत टेस्ट ड्रॉ झाली. या सामन्यादरम्यान अंधूक सूर्यप्रकाशामुळे ‘भारत ए’ संघाचे मॅच जिंकण्याचं स्वप्न साकार झाले नाही.भारतीय संघाने 234 रनच्या टार्गेटचा पाठलाग करताना 3 बाद 155 रन करत मॅचवर आपली पकड निर्माण केली होती. यानंतर खराब सूर्यप्रकाशामुळे खेळ थांबवावा लागला होता. जेव्हा खेळ थांबवण्यात आला तेव्हा 20 पेक्षा जास्त ओव्हर्सचा खेळ शिल्लक होता. यावेळी भारतीय टीमला मॅच जिंकण्यासाठी फक्त 79 रनची गरज होती. यावेळी हवामानात सुधारणा न झाल्याने मॅच ड्रॉ करण्यात आली. या मॅचमध्ये हनुमा विहारीनं (Hanuma Vihari) दोन्ही इनिंगमध्ये अर्धशतक झळकावले. यावेळी त्याने 116 बॉलमध्ये 12 फोरच्या मदतीनं नाबाद 72 रन काढले. विहारीनं पहिल्या इनिंगमध्येही अर्धशतक झळकावले होते.

सध्या चालू असलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये (India vs New Zealand Test Series) हनुमा विहारीची टीम इंडियात निवड झाली नव्हती. आता आगामी आफ्रिका दौऱ्यापूर्वी त्याने निवड समितीला आपल्या बॅटने उत्तर देत, दावेदारी सादर केली. हनुमा विहारीसह अभिमन्यू इश्वरन (Abhimanyu Easwaran) यानेही या इनिंगमध्ये अर्धशतक झळकावले. अभिमन्यू इश्वरन 55 रन काढून आऊट झाला. हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि अभिमन्यू इश्वरन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 133 रनची भागिदारी केली.

अभिमन्यू इश्वरन बाद झाल्यानंतर खराब सूर्यप्रकाशामुळे (Bad sunlight) खेळ थांबवण्यात आला.
या दोघांचा अपवाद वगळता बाकी भारतीय फलंदाजांना फारशी काही कमाल करता आलेली नाही.
यामध्ये पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) 18 रन काढून तर प्रियांक पांचाळ (Priyank Panchal) शून्यावर बाद झाला.याअगोदर दक्षिण आफ्रिकेची टीम दुसऱ्या इनिंगमध्ये 212 रन काढून ऑल आऊट झाली.
यावेळी इशान पोरेलने (Ishan Porel) 33 रन देत 3 विकेट्स घेतल्या.
तर नवदीप सैनी (Navdeep Saini) आणि अर्झन नगवासवाल (Arjun Nagwaswal) यांना प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

या तीन मॅचच्या सीरिजमधील तिसरी आणि शेवटची मॅच 6 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

Web Title : Hanuma Vihari | india a vs south africa 2nd unofficial test hanuma vihari shines but match drawn on 4th day due to bad light

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

GST on Notice Period | आता नोकरीला ‘रामराम’ करणे देखील महागात पडणार,
नोटीस पिरियडसाठी भरावा लागेल GST

Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक

Maharashtra Rains | पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस; जाणून घ्या कोठे किती झाला पाऊस

Central Bank of India Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी भरती; पगार 1 लाख रूपयांपर्यंत रुपये