Valentine’s Day 2019 : रणवीरच्या ‘आय लव्ह यू’चे राखीने दिले हे उत्तर, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राखी सावंत नेहमीच काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करत असते आणि नेहमीच चर्चेत असते. अनेकदा ती चित्रविचित्र वागत अनेकांचे लक्ष वेधून घेण्याचे काम करत असते. त्यामुळे आता वादग्रस्त वक्तव्य आणि राखी सावंत असं जणू समीकरणच झालं आहे. सोशल मीडियावर ती नेहमीच अॅक्टीव्ह असते. आज व्हॅलेंटाईन डे आहे. या निमित्ताने राखीने अभिनेता रणवीर सिंहसाठी खास भेट दिली आहे. काही दिवसांपूर्वी रणवीरने तिचे कौतुक केले होते. शिवाय तो तिला आय लव्ह यू असं म्हटलं होता. यानंतर त्याच्या या वक्तव्याबद्दल राखीने आज लेंटाइन डेच्या निमित्ताने त्याला खास रिटर्न गिफ्ट दिलं आहे.

राखीने या संदर्भात एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं आहे. राखीने एका खास अंदाजात रणवीरला आय लव्ह यू म्हटलं आहे. एवढेच नाही तर त्याच्या नावाचा टॅटूही तिने गोंदवून घेतला आहे. तिचे हे रिटर्न गिफ्ट पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. रणवीरही हे पाहून हैराण झाल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओमध्ये ती एका टॅटू पार्लरमध्ये रणवीरच्या नावाचा टॅटू गोंदवून घेताना दिसत आहे. राखीने रणवीर सिंह असं नाव गोंदवून घेतलं आहे. त्यासोबतच ती रणवीरला आय लव्ह यू देखील म्हणाली आहे.

इन्स्टाग्रामवर व्हिडीआओ शेअर करताना राखी म्हणाली की, “तू मला रॉकस्टार म्हणालास, माझं कौतुक केलं. इतकंच नाही तर मला आय लव्ह यूदेखील म्हणालास. तू माझ्यावर केलेल्या या प्रेमाच्या वर्षावाचं उत्तर कसं द्यावं मला समजत नाहीये. त्यामुळे मी थोडसं खास आणि हटके अंदाजात रिटर्न गिफ्ट देत आहे.”

राखीने हा व्हिडीओ शेअर करताना रणवीर, दीपिका आणि आलिया यांना टॅग केलं आहे. यानंतर तिने गली बाॅय या चित्रपटाचं प्रमोशन केल्याचंही दिसून आलं. शिवाय तिने काढलेल्या टॅटूबद्दल तिने दीपिकाला साॅरी म्हणत तिची माफीही मागितली. राखीने काही पोस्ट केले आणि ती ट्रोल झाली नाही तर ते नवलच. तिच्या या व्हिडीआेनंतर नेटकऱ्यांनी तिला नेहमीप्रमाणे ट्रोल केल्याचे दिसून आले.