Hardik Pandya | हार्दिक पंड्याची भावनिक पोस्ट, वर्ल्डकपमधून बाहेर झाल्यानंतर म्हणाला – ‘ही गोष्ट फार जड जाईल’

नवी दिल्ली : Hardik Pandya | पुण्यात १९ ऑक्टोबर रोजी झालेल्या बांगलादेशविरूद्ध भारत सामन्यात हार्दिक पंड्याला दुखापत झाली होती. त्यानंतर बेंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याच्यावर उपचार सुरू होते. आज असे वृत्त आले आहे की हार्दिक वर्ल्डकपमधून बाहेर झाला आहे. हार्दिक अखेरच्या साखळी सामन्यात किंवा सेमीफायनलमध्ये खेळू शकले असे वाटत असतानाचे हे वृत्त आले आहे. (Hardik Pandya)

वर्ल्डकपमधून बाहेर झाल्यानंतर हार्दिक पंड्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली असून यात म्हटले आहे की, ही गोष्ट पचवणे फार अवघड आहे की मी वर्ल्डकपमधील उर्वरील मॅच खेळू शकणार नाही. पण मी पूर्णपणे टीम सोबत असेन आणि प्रत्येक मॅचमधील प्रत्येक चेंडूवर त्यांना प्रोत्साहन देईन. सर्वांना माझ्या शुभेच्छा, प्रेम आणि पाठिब्यांसाठी धन्यवाद. ही टीम खास आहे आणि मला विश्वास आहे की आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करतील. (Hardik Pandya)

दरम्यान, वर्ल्डकपसाठी बीसीसीआयने ३ खेळाडूंना स्टॅडबाय ठेवले होते. यामध्ये तिलक वर्मा, विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन आणि जलद गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आहेत. यापैकी बीसीसीआयने हार्दिकच्या जागी प्रसिद्ध कृष्णाची निवड केली आहे.

कारण हार्दिकच्या फलंदाजीपेक्षा त्याच्या गोलंदाजीची सर्वाधिक उणीस भासणार आहे,
आणि स्टॅडबाय खेळाडूंमध्ये प्रसिद्ध एकमेव खेळाडू आहे जो त्याच्या जागी योग्य ठरू शकतो.
प्रसिद्ध कृष्णा काही महिन्यांपूर्वी पाठीच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर होता.
तत्पूर्वी तो वनडे क्रिकेटमध्ये भारताचा मुख्य गोलंदाज होता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune SPPU News | पुणे विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांच्या राडयानंतर परिसरात सुरक्षेत वाढ,
विद्यापीठ प्रशासनाचा मोठा निर्णय

पगारावरून वाद झाल्याने मालकाने केला कामगाराचा खून; राष्ट्रवादीच्या दयानंद इरकल याच्यासह 13 जणांविरुद्ध गुन्हा