Pune SPPU News | पुणे विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांच्या राडयानंतर परिसरात सुरक्षेत वाढ, विद्यापीठ प्रशासनाचा मोठा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दोन विद्यार्थी संघटनांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर दुसऱ्या दिवशी वसतिगहाच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला, यानंतर वाद वाढत गेला आणि आज बाहेरच्या व्यक्ती आणि संघटनांनी यात सहभाग घेतल्याने मोठा राडा झाला. बधुवार पासून हे प्रकरण सुरू आहे. येथील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याने आता विद्यापीठाने योग्य उपाययोजना करणार असल्याचे म्हटले आहे. (Pune SPPU News)

दरम्यान, विद्यापीठात हा प्रकार घडल्यानंतर येथील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. विद्यापीठात प्रवेश करणाऱ्यांची चौकशी आणि नोंदणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याचप्रमाणे वसतिगृहांमध्ये केवळ अधिकृत रहिवाशी विद्यार्थ्यांनाच बायोमेट्रिक प्रणालीद्वारेच प्रवेश दिला जाणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. (Pune SPPU News)

या बाबत सविस्तर माहिती अशी की, बुधवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर गुरुवारी विद्यापीठाच्या वसतिगृहातील भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचे आढळून आले. याबाबत अभाविपने तक्रार केली होती.

शुक्रवारी या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात घुसून आंदोलन केल्यानंतर त्यांचा नवसमाजवादी पर्याय संस्थेच्या कार्यकर्त्यांशी वाद झाला. यावेळी विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याच वृत्त आहे. विद्यापीठात अशाप्रकारच्या घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. हा राडा झाल्यानंतर विद्यापीठाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, सुरक्षेसंबंधी माहिती देताना विद्यापीठ प्रशासनाने म्हटले की, असे प्रकार टाळण्यासाठी सर्व प्रवेशद्वारांवर आवश्यक बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर चौकशी आणि नोंदणी केल्यानंतच प्रवेश देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठातील सर्व वसतिगृहांमध्ये केवळ अधिकृत रहिवाशी विद्याथ्र्यांनाच बायोमेट्रिक प्रणालीद्वारेच प्रवेश देण्यात येईल.

दरम्यान, हा गंभीर प्रकार घडल्यानंतर कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी एक परिपत्रक जारी केले
असून यात म्हटले आहे की, विद्यार्थी वसतिगृहाच्या भिंतींवर काही समाजकंटकांनी आक्षेपार्ह
आणि बदनामीकारक मजकूर लिहून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
काही व्यक्ती हा मजकूर समाजमाध्यमाद्वारे प्रसारित करून,
प्रसिद्धी देऊन या कृत्यात अप्रत्यक्षपणे सहभागी होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.
या सर्व संबंधितांविरुद्ध चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

विद्यापीठ या विकृत मानसिकतेचा जाहीर निषेध करते.
विद्यापीठाचे पावित्र्य जपणे समाजाच्या सर्व घटकांची नैतिक जबाबदारी आहे.
विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण कोणत्याही प्रकारे दूषित करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई
करण्यात येईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Metro News | पुण्यात १२ ठिकाणी महामेट्रो उभारणार वाहनतळ, मार्चमध्ये स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट मार्गावर धावणार मेट्रो

PM Modi-Free Ration | PM मोदींकडून दिवाळी गिफ्ट! देशातील 80 कोटी गरीबांना आणखी 5 वर्षे मोफत रेशन देणार

पगारावरून वाद झाल्याने मालकाने केला कामगाराचा खून; राष्ट्रवादीच्या दयानंद इरकल याच्यासह 13 जणांविरुद्ध गुन्हा