शिवसेनेवर हर्षवर्धन जाधवांची खालच्या पातळीवर जाऊन टीका, म्हणाले – ‘सत्तार कोण लागतो’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तशा राजकीय पक्षांमध्ये एकमेकांवर सडकून टीका होताना दिसत आहेत. काही वेळा मात्र या टीकेची पातळी घसरतानाही दिसत आहे. शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांनी अब्दुल सत्तार आणि मुस्लिमांच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका केली आहे. परंतु यावेळी त्यांची जीभ घसरली.

हर्षवर्धन जाधव म्हणाले, “मुसलमानांचे तुम्हाला एवढे वावडे आहे तर सत्तार तुमच्या आईचा नवरा लागतो का ?” असं त्यांनी म्हटलं आहे. सध्या त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर टीका केल होती. यांच्यामुळे इथं मुस्लिम खासदार झाला, भगवा खाली आला, हिरवा वर गेला अशी टिपण्णी शिवसैनिकही करू लागले आहेत असं त्यांनी म्हटलं होतं. यानंतर आता हर्षवर्धन जाधव यांनी खालच्या भाषेत त्यांच्यावर टीका केली आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी