आता याला काय म्हणावं ! दुखापत झाली कमरेच्या उजव्या बाजूला अन् डॉक्टरांनी ऑपरेशन केलं डाव्या बाजूचे

गुडगाव : वृत्तसंस्था – डॉक्टरांकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा एका देवासारखाच असतो. पण त्याचं डॉक्टरच्या बेजबाबदारपणामुळे एका वृद्ध महिलेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. त्या महिलेच्या कमरेच्या उजव्या बाजूला दुखापत झाली होती. पण डॉक्टरांनी चक्क तिच्या कमरेच्या डाव्या बाजूचे ऑपरेशन केले.

हरियाणातील भिवानी येथील चौधरी बन्सीलाल नागरी रुग्णालयात घडली. त्यामुळे हे रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यांनी केलेल्या बेजबाबदारपणा वृद्ध महिलेच्या जीवावार उठला. त्यानंतर कुटुंबाने मोठा गोंधळ घातला. या घटनेनंतर मुख्यमंत्री कार्यालयानेही तातडीने चौकशी समिती स्थापन केली.

भिवानी येथील रानिला गावात राहणाऱ्या वृद्ध महिला भतेरी येथील घरात पडली. त्यामुळे तिला दुखापत झाली होती. त्यानंतर तिला भिवानीच्या चौधरी बन्सीलाल नागरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या कमरेच्या उजव्या बाजूला दुखापत झाली होती. त्यामुळे तिच्यावर ऑपरेशन करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी तिच्या उजव्या बाजूऐवजी डाव्या बाजूचे ऑपरेशन केले आणि त्या ऑपरेशनचे 15 हजार रुपये खर्चही घेतला. पण जेव्हा डॉक्टरांना त्यांची चूक लक्षात आली तेव्हा त्यांनी तातडीने एक खाजगी रुम देत कमरेच्या उजव्या बाजूचे ऑपरेशनही केले, असे त्या वृद्ध महिलेच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.

डॉक्टरांचीच चूक बेतली जीवावर
डॉक्टरांची चूक नसती तर त्यांनी भतेरी देवी यांच्यासाठी मोफत खाजगी रुम दिली नसती. दुसऱ्यांदा झालेल्या ऑपरेशनचा खर्चही केला नसता.