शमीने जाहीर माफी मागितल्यास माफ करेन : हसीन जहाँ

कोलकाता : वृत्तसंस्था
मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ शमीला भेटण्यासाठी आपल्या मुलीसह मंगळवारी देहरादूनला रवाना झाली. दोन दिवसापूर्वी शमी एका रस्ता अपघातामध्ये जखमी झाला होता. यामुळे त्याला भेटण्यासाठी हसीन देहरादूनला गेली.

शमीने माझी जाहीर माफी मागितली तर त्याला आपण माफ करू,असे हसीन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शमी आणि माझे भांडण अद्याप मिटले नाही. मात्र, शमी जखमी असल्याने मुलीला घेऊन त्याला भेटायला जात आहे. मला आशा आहे मुलीला पाहिल्यावर शमीला चांगले वाटेल.

दरम्यान , हसीनने लग्नबाह्य संबंध, घरगुती हिंसा तसेच शमीने जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन शमीच्या विरोधात कोलकाता पोलिसांनी अजामीनपात्र गुन्हे दाखल केले आहेत.