हाथरस येथील घटनेचा ‘नाझ ए वतन’ संस्थेच्या वतीने निषेध

लासलगाव – उत्तरप्रदेश येथील हाथरस येथे १९ वर्षाच्या पिडीतेवर चार नराधमांनी बलात्कार करुण तिच्या शरीराचे शारिरीक विडंबन केले आणि सदर पिडीतेचा रुग्णालयात उपचार घेतांना मृत्यू झाला. या घटनेचा लासलगाव येथे नाझ ए वतन संस्थेच्या वतीने निषेध करण्यात आला आणि या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीचे निवेदन सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांना देण्यात आले

या वेळी नाझ ए वतन संस्थेच्या संचालिका फरीदा काजी यांनी निषेध व्यक्त करतांना सांगितले की,या घटनेतील पीडितेवर अमानुषपणे बलात्कार केला वर्षाला साधारणपणे १४ तलाक होतात आणि यातील दोघेही स्त्री व पुरुष जिवंत राहतात फक्त वेगळे होतात,त्यांच्या साठी सरकारने कायदे पारित केले आहे आणि बलात्कार करणाऱ्याला कुठलाही ठोस कायदा नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे.या घटनेतील नराधामाना भर चौकात फाशी दिली पाहिजे,प्रत्येक पीडितेला न्याय मिळाला पाहिजे.बलात्कार करणाऱ्याला अरब राष्ट्रात ज्या प्रमाणे”सजा ए मौत”ची शिक्षा दिली जाते अश्या प्रकारच्या कठोर कायद्याची भारतात गरज असल्याचे या वेळी फरीदा काजी यांनी नमूद केले

या वेळी निवेदन देतांना नाज-ए-वतन च्या संचालिका फरीदा काझी,माया वाघ,कामदा कुंभारडे,सपना पारीक,इशरत शेख,कांचन वाघ,भारती वाघ,आशा खैरनार,आयेशा काझी,प्रतीक्षा बागडणी,अर्चना गायकवाड,मांगल बागडणी,शिल्पा सूक्ते,शेख भाभी आदी महिला उपस्थित होत्या.