Alert ! तुम्ही HDFC बँकेचे ग्राहक आहात ?, तुम्हाला रात्रापीसून डेबिट कार्ड वापरता येणार नाही, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – खासगी क्षेत्रातील HDFC बँकेने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना सतर्क करताना म्हटले आहे की, मेन्टेन्स प्रक्रियेसाठी बँकेचे डेबिट कार्डशी निगडीत सर्व सुविधा गुरुवारी (दि.4) रात्री 12.30 पासून सकाळी 5 पर्यंत बंद राहणार आहेत. या कालावधीमध्ये ग्राहकांना डेबिट कार्डच्या माध्यमातून ATM मधून पैसे काढता येणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. रात्री साडेबारा पासून पहाटे पाच वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारचा बँकींग व्यवहार आणि पेमेंट करता येणार नाही.

याशिवाय बँकेने त्यांच्या Credit Card बाबत देखील मेन्टेन्स शेड्युल्ड जारी केले आहे. बँकेचे ग्राहक बुधवारी (दि.3) पहाटे दोन ते तीन या कालावधीत क्रेडिट कार्डाशी निगडीत कोणत्याही सुवेधेचा वापर करु शकणार नाहीत, यासंदर्भात बँकेने ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. या कालावधीत बँकेने मोठा नफा मिळवला आहे. वार्षिक आधारावर 18.1 टक्के वाढीसह बँकेचा निव्वळ नफा 8758.3 कोटी इतका आहे.

एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, HDFC बँकेने डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या तिमाहीचा शनिवारी निकाल जाहीर केला आहे. मागील वर्षी याच कालावधीत बँकेचा नफा 7416.48 कोटी होता. खासगी कर्ज पुरवठादाराचे निव्वळ व्याज उत्पन्न या तिमाहीच्या आढावा कालावधीत वार्षिक आधारावर 15.1 टक्क्यांनी वाढ होऊन ते 16317.6 कोटी रुपयावर गेले आहे. गेल्या वर्षी याच काळात ती 14172.9 कोटी होती.