‘HDFC’ च्या ग्राहकांना फटका, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक HDFC बँकने फिक्स्ड डिपॉजिटवरील व्याज दरात बदल केले आहेत. बँकेने दोन कोटी रुपयांच्या रक्कमपेक्षा कमी एफडीवरील व्याजाचे दर कमी केले आहेत. हे नवीन दर २२ जुलैपासून लागू होतील. HDFC ने ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी वेगवेगळ्या एफडीवर वर्षाला ३.५० टक्क्यांपासून ते ७.३० टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. मागील दिवसात भारतीय रिजर्व बँकने रेपो रेट दरात कपात केली आहे. ज्यानंंतर आता अपेक्षा केली जात आहे की एक एक करुन सर्व बँकांच्या व्याज दरात बदल होतील.

HDFC बँकेने ३० दिवसांपेक्षा जास्तच्या FD वर व्याज दरात कपात केली आहे. बँकेच्या वेबसाइटच्या मते एचडीएफसी बँकेने ३० दिवसांपासून ६ महिने, ६ महिन्यापासून १ वर्षांपर्यंतच्या मॅच्युरिटीपर्यंत असणाऱ्या एफडीवरील व्याज दरात बदल केला आहे. याशिवाय लॉन्ग टर्म टॅक्स सेविंग एफडीवर मिळणाऱ्या व्याज दरात देखील बदल केला आहे.

२२ जुलै च्या आधी HDFC बँक ३० दिवसांपासून ४५ दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांला ५.७५ टक्के तर जेष्ठ नागरिकांना ६.२५ टक्क्याने व्याज देत होते. मात्र आता कपात केल्यानंतर सामान्य नागरिकांना ५.५० टक्के आणि जेष्ठ नागरिकांना ६.०० टक्के व्याज देण्यात येईल. याशिवाय ४६ दिवसांपासून ते ६ महिन्याच्या एफडीच्या व्याज दर ६.२५ टक्कांवरुन कमी करुन ६.०० टक्के करण्यात येईल.

याशिवाय एका वर्षासाठीच्या एफडीच्या व्याज दरात ०.२० टक्के कपात करण्यात येईल. आता हे ७.१० टक्के असेल. जेष्ठ नागरिकांना कायमच ०.५० टक्के आधिक व्याज मिळते. याशिवाय १ वर्ष ते २ वर्षाच्या एफडीच्या व्याज दरात देखील कपात करण्यात आली आहे. आता हे व्याजदर ७.३० ने कपात करून ७.२० टक्के करण्यात आले आहे. HDFC बँकने सात दिवसांपासून २९ दिवसांपर्यंतच्या FD व्याज दरात कोणतेही बदल केले नाहीत. म्हणजेच या ग्राहकांना पहिल्यासारखे ४.२५ टक्के व्याज मिळेल.

आरोग्यविषयक वृत्त