‘त्याने माझ्या पँटमध्ये हात घातला’ : साकिब सालेम

मुंबई : वृत्तसंस्था – सध्या देशभरात मीटूचं वादळ जोरात सूरू आहे. मीटूच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक गुलदस्त्यात राहिलेल्या कहाण्या एकामागे एक बाहेर येताना आपल्याला दिसल्या. अनेक महिलांनी त्यांच्यावरील झालेल्या अत्याचाराबद्दल, त्यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाबद्दल त्यांना आलेले अनुभव सांगितले.  आतापर्यंत अनेक महिलांनी आपल्यावरील लैंगिक अत्याचाराचे अनुभव सांगितले. अनेक पुरुष कलाकारांनी त्यांना पाठिंबा दिला. मात्र सध्याच्या ‘मी टू मूव्हमेंट’मध्ये कदाचित पहिल्यांदाच एका अभिनेत्याने आपल्यासोबत झालेल्या लैंगिक गैरवर्तनाबाबत जाहीर वाच्यता केली आहे. रेस 3, ढिश्यूम सारख्या चित्रपटातील अभिनेता साकिब सालेमने 9 वर्ष जुनी असलेली नकोशी आठवण सांगितली.
2009 साली, म्हणजे 21 वर्षांचा असताना आलेला दु्र्दैवी अनुभव साकिबने एका मुलाखतीत सांगितला. ‘मला कोणाची नावं घ्यायची नाहीत. मी अभिनेता म्हणून सुरुवात केली, तेव्हा अवघा 21 वर्षांचा होतो. त्या व्यक्तीने माझ्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याने माझ्या पँटमध्ये हात घालण्याचा प्रयत्न केला. माझा विरोध त्याच्या सेक्शुअॅलिटीला नाही, तर त्याच्या कृत्याला होता’ असंही साकिब म्हणाला.
 [amazon_link asins=’B07HGBFSC7,B01D2IBM5S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6a607b04-d11b-11e8-9bc5-eb0976b2a7e0′]
‘त्या व्यक्तीचे चित्रपटसृष्टीत अनेक समलिंगी मित्र आहेत. जेव्हा ही घटना माझ्यासोबत घडली, तेव्हा मी त्याला फैलावर घेतलं. मी निघून गेलो. मी केवळ 21 वर्षांचा होतो. मी घाबरलोही होतो. पण मी ती घटना विसरण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक जण वेगळा असतो, त्यामुळे अशा घटनांचा प्रत्येकावर वेगवेगळा परिणाम होतो’ असंही साकिबने म्हटलं.
साकिब सालेम हा प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशीचा भाऊ. 2011 मध्ये त्याने ‘मुझसे फ्रँडशिप करोगे?’ चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर मेरे डॅड की मारुती, बॉम्बे वेल्वेट, हवाहवाई, ढिश्यूम, रेस 3 सारख्या सिनेमात त्याने अभिनय केला.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7b6fb2ab-d11b-11e8-af2b-0bbb3737a74f’]