ऑलंपिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार ‘फरार’ घोषित, माहिती देण्यार्‍यास 1 लाख रुपयांचे बक्षीस; जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतीय कुस्ती जगताला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणारा सुशील कुमार सध्या अडचणीत आला आहे. भारताला ऑलंपिकमध्ये प्रथम कांस्य आणि नंतर रजत पदक मिळवून देणार्‍या कुस्तीपटूला फरार घोषित करण्यात आले आहे. सागर हत्याकांडात सुशीलला आरोपी करण्यात आले आहे आणि त्याला पकडण्यासाठी पोलीस सतत प्रयत्न करत आहेत. आता या ऑलंपिक पदक विजेत्या पहिलवानास पकडण्यासाठी 1 लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.

दिल्ली पोलिसांनी मॉडल टाऊन येतील छत्रसाल स्टेडियममध्ये पहेलवान सागर धनखड याच्या हत्या प्रकरणात आरोपी सुशील कुमार याच्या अटकेवर सोमवारी एक लाख रूपयांचे बक्षीस घोषित केले आहे. त्याचा साथीदार अजयच्या अटकेवर 50 हजाराचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

हत्येच्या या प्रकरणात सुशीलसह 9 लोक फरार आहेत. एका पोलीस अधिकार्‍यानुसार, सुशील आणि इतर आरोपींना कोर्टाने फरार घोषित करणे आणि जप्ती वॉरंटची प्रक्रिया सुद्धा सुरू केली आहे. यापूर्वी शनिवारी रोहिणी कोर्टाने आरोपींविरूद्ध विना जामीन वॉरंट जारी केले आहे.

4 मे रोजी सुशील कुमार काही गँगस्टर सोबत छत्रसाल स्टेडियममध्ये पोहोचला होता. आरोप आहे की, आरोपींनी सागर धनखडला बेदम मारहाण केली, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.