तुम्हाला निरोगी ठेवण्याबरोबरच परिसरातील वातावरण देखील शुध्द ठेवतील ‘ही’ 5 झाडे, ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – ऑक्सिजन आपल्या सर्वांच्या जीवनात किती गरजेचा आहे. याचे मूल्य आता लोकांना समजत आहे. आपल्या वातावरणात पसरणारा ऑक्सिजन एक निरोगी व्यक्तीसाठी पुरेसा असतो. मात्र, आजारी व्यक्तीसाठी हाच पुरेसा नाहीतर योगा, प्राणायमचा सल्ला दिला जातो. त्याने शरीरात जास्तीत जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळू शकेल.

ऑक्सिजनचा मुख्य स्त्रोत झाडे आहेत. या झाडांमुळे ऑक्सिजनची कमतरता भरून काढता येऊ शकते.

– जाणून घेऊया कोणती आहेत ती झाडे…

तुळस

जास्तीत जास्त घरातील अंगण तुळशीच्या रोपांनी भरल्याचे पाहिला मिळते. तुळशीची रोपं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामध्ये भरपूर प्रमाणात ऑक्सिजनचा स्त्रोत असतो. तुळसीचे छोटेसे रोप फक्त दिवसा नाहीतर रात्रीचेही ऑक्सिजन देते. त्यामुळे घरात नक्की लावावे.

कडूलिंबाचे झाड

सुंदरता वाढवण्यासाठी, स्किन इन्फेक्शन दूर करण्यासाठी सर्वात आधी कडूलिंबाच्या पानांचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. ऑक्सिजनचा जर विषय आलाच तर दिवसातील 22 तास ऑक्सिजन देण्याचे काम कडुलिंबाचे झाड करते.

पिंपळाचे झाड

आपल्या देशात पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. या झाडाला धार्मिक महत्त्वही आहे. हे झाड जास्त प्रमाणात ऑक्सिजन देते. पिंपळाचे झाडे पूर्ण 24 तास ऑक्सिजनचा पुरवठा करते, असे मानले जाते.

वडाचे झाड

वडाचे झाड राष्ट्रीय वृक्ष मानले जाते. हे झाडही जवळपास 22 तासांपर्यंत ऑक्सिजनची निर्मिती करते. जितके झाड मोठे असते तितके मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती होते.

अशोकाचे झाड

पिंपळ, वड आणि कडूलिंबाचे झाड विशाल नसते. मात्र, हे झाड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करते. अशोकाचे झाड ऑक्सिजन देण्यासह हानिकारक गॅस एब्जॉर्ब करून वातावरणात शुद्धता निर्माण करते.