डोकेदुखी असो की पोटदुखी, हिंग खाल्यानं मिळतील जबरदस्त फायदे, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  हिंग प्रत्येक घरात वापरले जाते. अन्नाची चव वाढविण्याबरोबरच याचा उपयोग औषधे बनवतानाही केला जातो. यामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह इत्यादी भरपूर असतात. या व्यतिरिक्त त्याचे अँटी-व्हायरल, अँटी-बायोटिक, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म बर्‍याच आजारांपासून बचाव करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत.

हिंगचे फायदे

१) पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो

पोटातील गॅस, पोटदुखी, अपचन इत्यादी समस्या दूर करण्यासाठी हिंग फायदेशीर आहे. एक चिमूटभर हिंग, भाजी किंवा कोशिंबीरमध्ये किंवा कोमट पाण्यात मिसळल्यास त्वरित आराम मिळतो.

२) नवजात बाळासाठी फायदेशीर

पाण्याबरोबर हिंग द्राव तयार करुन लहान मुलाच्या नाभीभोवती लावल्यास पोटातील गॅस बाहेर येतो.

३) भूक वाढते

अपचनामुळे त्रास होत असेल तर हिंग आणि सेंधा मीठ पावडर समान प्रमाणात मिसळा आणि दिवसातून तीन वेळा चिमूटभर घ्या. यामुळे भूकही वाढते.

४) वेदना कमी करते

दातदुखी, मायग्रेन, डोकेदुखी, मासिक पाळी दरम्यान वेदना दूर करण्यातही हिंग खूप उपयुक्त आहे. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात एक चिमूटभर हिंग उकळवा आणि कोमट झाल्यावर त्याचे सेवन करा. तसेच सांधेदुखीपासून आराम मिळतो.

५) खोकला दूर होतो

मध आणि १ थेंब आल्याचा रस हिंगमध्ये मिक्स करून घ्या. त्यामुळे खोकल्याला लवकरच आराम मिळतो.

६) मधुमेह नियंत्रण

डाळ आणि भाजीमध्ये हिंग वापरल्याने मधुमेहावर नियंत्रण येते.

७) उचकी

यातून आराम मिळण्यासाठी गुळाबरोबर हिंग खाल्ल्याने उचकीपासून त्वरित आराम मिळतो.

हिंगाचे तोटे

जास्त प्रमाणात सेवन केल्याने नुकसान देखील होऊ शकते. एका दिवसात हे १०० किंवा १५० मिली पेक्षा जास्त सेवन करू नये कारण त्याचा परिणाम खूपच गरम आहे. गर्भवती महिलांनी त्याचे सेवन करू नये. कधीकधी यामुळे पोटात अल्सर, उच्च रक्तदाब इ. होऊ शकते.