Health Benefits of Coconut water | ‘या’ 7 मोठ्या आजारांमध्ये लाभदायक आहे नारळपाणी, जाणून घ्या कोणत्या रोगांशी लढण्यासाठी वाढवते ताकद

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Health Benefits of Coconut water | नारळपाण्यात शुगर आणि कॅलरीज कमी असतात. याच्यात पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम सारखे इलेक्ट्रोलाइट्स (Coconut Water Nutrients) देखील असतात, जे सर्व गमावलेल्या पोषक तत्वांची भरपाई करण्यास मदत करतात. याचा अर्थ व्यायामानंतर नारळपाणी हे सर्वोत्तम वर्कआउट ड्रिंक (Post Workout Drink) आहे. हे आरोग्यासाठी चांगले आहेच, शिवाय थेट त्वचेवर लावता येते. नारळपाणी मुरुमांशी लढण्यासाठी (Coconut Water for Acne) उपयुक्त ठरू शकते (Health Benefits of Coconut water).

 

नारळपाणी फॅट आणि कोलेस्टेरॉल फ्री असल्याने हायड्रेटेड (Hydrate) राहण्यास मदत करते. अनेक आरोग्य समस्यांसाठी नारळपाणी (Coconut Water for Health Problems) हे एक रिकव्हरी डिंक असू शकते. वर्ल्ड कोकोनट डे (World Coconut Day) निमित्त नारळपाणी पिण्याचे आरोग्य फायदे जाणून घेवूयात…

 

या आजारांमध्ये नारळपाणी फायदेशीर (Coconut Water Is Beneficial in These Diseases)

1) कोलेस्ट्रॉल कमी करते
नारळपाणीमध्ये 94 टक्के पाणी असते आणि ते फॅट आणि कोलेस्ट्रॉल फ्री असते. नारळपाण्यातील कोलेस्टेरॉल-कमी (Lower Cholesterol) करण्याच्या गुणधर्माचे कारण म्हणजे त्यातील पोटॅशियम सामग्री आहे जी खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. (Health Benefits of Coconut water)

 

2) किडनी स्टोनपासून बचाव (Kidney Stones)
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबिटीज अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीजच्या मते, यूएसमधील 11 टक्के पुरुष आणि 6 टक्के महिलांना त्यांच्या आयुष्यात एकदा तरी मुतखडा होतो. ते टाळण्यासाठी हायड्रेटेड राहणे महत्वाचे आहे. नारळपाणी प्यायल्याने आराम मिळतो आणि सिस्टम फ्लश होण्यास मदत होते.

3) हृदयरोग्यांसाठी फायदेशीर (Heart Disease)
नारळपाणी हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते. यामध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब कमी करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, एका जुन्या अभ्यासात असे आढळून आले आहे की नारळपाणी हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते.

 

4) मधुमेहामध्ये फायदेशीर (Diabetes)
गोड पेयांऐवजी नारळपाणी प्यायल्याने मधुमेही व्यक्तीची ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित (Blood Sugar Level Control) ठेवता येते. मात्र, शुगरच्या रुग्णांनी नारळपाण्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

 

5) लठ्ठपणाची समस्या (Obesity)
जेव्हा गोड खाण्याची इच्छा होते तेव्हा नारळपाणी सर्वोत्तम आहे. हे गोड पेयांसाठी पर्याय ठरू शकते.
यामुळे वजन कमी (Weight Loss) करण्याच्या प्रयत्नांना मदत होते आणि वजन मध्यम राखण्यात मदत होते.

 

6) हाय ब्लड प्रेशरमध्ये उपयुक्त (High Blood Pressure)
पोटॅशियम समृद्ध असल्याने, नारळाचे पाणी रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकते.
संशोधनात असे दिसून आले आहे की पोटॅशियम समृद्ध डाएट रक्तदाब नियंत्रित करून
आणि स्ट्रोकपासून संरक्षण करून हृदयाच्या आरोग्यास मदत करू शकतो.

7) अ‍ॅसिडिटीपासून आराम (Acidity)
अ‍ॅसिड रिफ्लक्स किंवा जीईआरडी असलेल्या लोकांसाठी गोड नसलेले नारळपाणी हा आणखी एक उत्तम पर्याय असू शकतो.
हे पेय पोटॅशियम सारख्या उपयुक्त इलेक्ट्रोलाइट्सचा चांगला स्रोत आहे. हे शरीरातील पीएच संतुलनास देखील प्रोत्साहन देते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Health Benefits of Coconut water | coconut water is beneficial in these 7 major diseases increases the power to fight against many health problem

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Water Supply | पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा रविवारी बंद राहणार

 

PM Kisan 12th Installment | पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट, ‘या’ 10 स्थितीत मिळणार नाही पैसा

 

Ganeshotsav 2022 | पुण्यातील मानाच्या गणपती विसर्जन संदर्भात दाखल केलेली याचिका हाय कोर्टाने फेटाळली