मूळव्याध आणि हृदयरोगांवर गुणकारी आहे मुळा ! जाणून घ्या इतर फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कंदमुळ या प्रकारात मोडणारा मुळा हा शरीरासाठी खूप गुणकारी आहे. खास बात अशी की, हृदयाशी संबंधित आजारात किंवा कोलेस्ट्रॉल रुग्णांसाठी मुळ्याचं सेवन खूप लाभदायक ठरतं. आज आपण मुळा खाण्याचे कोणते आरोग्यदायी फायदे होतात याची माहिती घेणार आहोत.

1) पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मुळ्याचं सेवन करणं फायदेशीर आहे.

2) मुळा खाल्ल्यांमुळं रक्तदाब नियंत्रणात राहतो.

3) मुळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी मुळ्याचं सेवन फायदेशीर आहे.

4) मुळव्याधीत असलेल्या क जीवनसत्व, फॉस्फरस, जस्त (झिंक) आणि बी कॉम्प्लेक्समुळं त्वचाविकार दूर होतात.

5) मुत्राशयासंबंधित समस्या उद्भवल्यास मुळा नैसर्गिक औषधाचं काम करतो.

6) मुळा खाल्ल्यामुळं वजन कमी होण्यास मदत होते.

7) मुळ्याचं सेवन केलं तर यामुळं रक्त शुद्ध होतं आणि रक्तात ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत होतो.

8) कावीळ झाल्यास जेवणात मुळ्याचा समावेश करावा.

टीप –  वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.