पोहे खाण्याचे ‘हे’ 5 मोठे फायदे तुम्हाला माहितीयेत का ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेकांना नाष्ता म्हटलं की पोहे खायचे असतात. ते रोज आवडीनं त्याचं सेवन करतात. परंतु तुम्हाला माहित आहे का पोह्याचे आपल्या शरीराला देखील अनेक फायदे होतात. हे फायदे नेमके कोणते आहेत याची आज आपण माहिती घेणार आहोत.

1) वजन कमी होतं – पोह्यांमध्ये कॅलरीज कमी असतात. एक वाटीत केवळ 206 कॅलरीज असतात. यामुळं वजन वाढत नाही. जे वजन कमी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी पोहे खूप लाभदायक आहेत.

2) शरीरात ऊर्ज वाढते – दिवसभरात काम केल्यानं खूप थकवा आणि ताण येतो. जर तुम्ही नाष्यात पोहे खाल्ले तर यापासून बचाव होऊ शकतो. यानं शरीराला खूप ऊर्जा मिळते. पोह्यांसोबत तुम्ही सोयाबिन, सुकामेवा, अंडी खाल्लीत तर जास्त फायदा मिळतो.

3) पचनक्रिया सुधारते – पोहे पचायला हलके असल्यानं यामुळं पचनशक्ती वाढण्यास मदत होते. पचन चांगलं झालं तर वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.

4) पोषकघटकांचा समावेश – एक मोठी वाटी पोह्यात 75 टक्के कार्बोहायड्रेट, 8 टक्के प्रोटीन, आयर्न, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, सी आणि डी यांचं भरपूर प्रमाण असतं. यामुळं सुपरफूड म्हणूनही पोह्याकडं पाहिलं जातं. यात 76.9 टक्के कार्ब्स आणि 23 टक्के चरबीयुक्त पदार्थ असतात. त्यामुळं वजन कमी करण्यासाठी तुम्ही याचं सेवन करू शकता.

5) भूकेवर नियंत्रण – पोहे पचायला हलके असतात. यामुळं पोट लवकर भरतं. म्हणून तुम्हाला लवकर भूक लागत नाही.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.