Health Care Tips | तुम्ही सुद्धा आहात घामोळ्यांनी त्रस्त? तर अवलंबा ‘हे’ 2 घरगुती उपाय; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Health Care Tips | उन्हाळ्यात बहुतांश लोक घामोळ्यांच्या समस्यांनी त्रस्त असतात. तर घामोळ्यांमुळे सतत खाज आणि शरीरावर लाल चट्टे सुद्धा पडतात. अशावेळी काही घरगुती उपाय केले तर या समस्येपासून सुटका होऊ शकते. हे उपाय कोणते ते (Health Care Tips) जाणून घेवूयात…

 

घामोळ्या म्हणजे काय…

घोमोळ्यात त्वचेच्या काही भागात खडबडीतपणा जाणवतो. ज्यामुळे खाज येते. शरीरावर छोटे-छोटे लाल दाणे येतात. हे सामान्यपणे शरीराच्या त्या भागात येतात जो कपड्याने झाकलेला असतो. जसे की पाठ, मान आणि पोट.

 

घामोळ्यांवर करा हे उपाय

मुलतानी माती (Multani Mati)

मुलतानी माती बंद पोर्स उघडते. त्वचा रिफ्रेश करते. घामोळ्यांपासून सुटका करण्यासाठी मुलतानी माती गुलाब जलमध्ये मिसळा आणि त्याची पेस्ट घामोळ्या असलेल्या भागावर लावा. 20 मिनिटे तसेच ठेवा. असे रोज केल्याने घामोळ्या ठिक होतात.

 

बेकिंग सोडा (Baking Soda)

बेकिंग सोड्यात अँटीबॅक्टेरियल गुण असतात. तसेच हा उष्णता आणि घामामुळे होणारा संसर्ग रोखतो.
यासाठी 2 चमचे बेकिंग सोडा 1 वाटी पाण्यात मिसळून शरीराच्या त्या भागावर लावा जिथे घामोळ्या आहेत.
थोड्या वेळाने धुवून टाका.
असे दोन दिवसात दोन वेळा करा. आराम मिळेल.

 

Web Title : Health Care Tips | health care tips get rid of prickly heat in summer and multani mitti

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update