Covid-19 and Dry Cough : सुका खोकला सुद्धा कोविड-19 चे एक लक्षण, जाणून घ्या घरात कसा करावा उपचार

नवी दिल्ली : कोरोना काळात सुका खोकला त्रासदायक ठरू शकतो. कोरोनाचे एक लक्षण सुका खोकला सुद्धा आहे. हवामानात थोड जरी बदल झाला किंवा थंड पदार्थांचे जास्त सेवन केल्यास सुका खोकला होऊ शकतो. बहुतांश लोकांना सुका खोकला वायरल संसर्गामुळे होतो, तसेच सर्दी किंवा फ्लूमुळे होतो. यावरील घरगुती उपाय जाणून घेवूयात…

1 मधाचे सेवन करा :
मधात अँटी-ऑक्सीडेंट, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुण असल्याने सुक्या खोकल्यात आराम मिळतो. एक ग्लास कोमट दुधात एक चमचा मध टाकून प्या.

2 तुळशीचे सेवन करा :
तुळशीची पाने पाण्यात उकळवून त्याचा काढा प्यायल्यास सुका खोकल्यात आराम मिळू शकतो.

3 आले उपयोगी :
एक चमचा आल्याच्या रसात मध मिसळून चाटण घ्या. यामुळे सुका खोकला दूर होईल, इम्युनिटीसाठी सुद्धा आले उपयोगी आहे.

4 कांद्याचा रस परिणामकारक :
अर्धा चमचा कांद्याच्या रसात एक चमचा मध मिसळून दिवसात किमान दोन वेळा याचे सेवन करा.

5 ज्येष्ठमध :
चवीला गोड असलेल्या ज्येष्ठीमधात कॅल्शियम, ग्लिसरायजिक अ‍ॅसिड, अँटी-ऑक्सीडेंट, अँटीबायोटिक, प्रोटीन आणि वसा गुण भरपूर असल्याने ती अनेक रोगांवर उपयोगी आहे.