Hair Care Tips : जर तुम्हाला हवे असतील ‘लांब’, ‘काळे’ आणि ‘दाट’ केस तर घरीच ‘या’ 3 गोष्टींचा करा वापर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जमाना फॅशनचा आहे, असे असताना फक्त तुमच्या कपड्यांकडे नाही तर तुमच्या हेअर स्टाइलकडे देखील पाहिले जाते. त्यामुळे महिलाच काय करत पुरुष देखील चांगले काळे, आणि दाट केस वाढवू इच्छितात. परंतु हार्मोनमधील असंतुलन, व्यस्त दिनक्रम, औषधांचे जास्त सेवन, तणाव, चुकीच्या जेवणाच्या पद्धती यामुळे केस पांढरे होण्यास आणि गळण्यास सुरुवात होते. परंतु काही टिप्स घरच्याघरी तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला काही दिवसात काळेभोर, लांब, दाट केस मिळतील.

Castor चे तेल –
जर तुम्ही तुमचे केस लांब, काळे आणि दाट करु इच्छित असाल तर Castor चे तेल थोडे गरम करा. यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि केसांवर लावून मसाज करा. त्यानंतर 20 मिनिटांनी केस धुवा.

कच्चे अंडे –
जर तुम्ही तुमचे केस मजबूत करु इच्छित असाल तर कच्च्या अंड्याचा वापर तुम्ही करु शकतात. अंड्यामध्ये विटामिन बी चे प्रमाण जास्त असते. यामुळे केस गळती कमी होते. यासाठी एक अंडे फोडा ते चांगले मिसळा आणि केसांंवर लावा. याचा वास तसा कोणालाही न आवडणारा आहे. अशा वेळी तुम्ही अंडे मिसळताना त्यात काही तरी सुगंधी द्रव्य टाकू शकतात. केसांवर लावलेले हे मिश्रण सुकल्यावर केस स्वच्छ धुवून घ्या.

नारळाचे तेल –
नारळाच्या तेलात प्राकृतिक गुण असतात जे केसांसाठी चांगले असतात. जर तुम्ही केस पांढरे होणे आणि केस गळण्याने चिंतेत असाल तर नारळाच्या तेलाचा वापर केसांवर करा. नारळाचे तेल तुम्ही विविध प्रकारे वापरु शकतात जसे की थोडे गरम करु रोज झोपताना केसांना लावून मसाज करणे. याने तुमच्या केसांना योग्य ते पोषण मिळेल आणि केस चांगले काळे, लांब आणि दाट होतील.