IRDAI ची सक्ती ! प्रीमियम वाढविण्यासाठी कंपन्यांनी बदलू नये विद्यमान आरोग्य विमा पॉलिसी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (IRDAI) आरोग्य विमा प्रदान करणाऱ्या कंपन्यांना प्रीमियम वाढविण्यासाठी विद्यमान आरोग्य विमा योजनांमध्ये कोणताही बदल करु नये असे सांगितले आहे. ही सूचना वैयक्तिक अपघात आणि ट्रॅव्हल इन्शुरन्स कव्हरलाही लागू असेल असेही स्पष्ट केले आहे. IRDAI ने म्हंटले की, आरोग्य विमा कंपन्या (हेल्थ इन्शुरन्सर्स) विद्यमान योजनांमध्ये काही बदल करु शकतात, परंतु हे बदल जुलै 2020 मध्ये जाहीर झालेल्या आरोग्य विमा व्यवसायातील उत्पादन दाखल करण्याच्या एकत्रित मार्गदर्शक सूचनांनुसार असावेत.

विद्यमान पॉलिसीमध्ये नवीन लाभासाठी विमाधारकाची घ्यावी लागेल मान्यता
आयआरडीएने स्पष्टपणे सांगितले की, विद्यमान आरोग्य विमा योजनांमध्ये नवीन लाभ ॲड-ऑन कव्हर्स किंवा पर्यायी कव्हर्स म्हणून देता येतात. यासाठी पॉलिसीधारकाची मान्यता आवश्यक आहे. विमा नियामकाने अप्लाइड अ‍ॅक्ट्युअरीजना आर्थिक वर्षाच्या शेवटी प्रत्येक आरोग्य विमा उत्पादनांच्या आर्थिक व्यवहार्यतेचा आढावा घेण्यास सांगितले आहे. हा आढावा अहवाल विमा कंपनीच्या मंडळाला सादर केला जाईल. त्याशिवाय प्रत्येक उत्पादनाशी संबंधित चांगल्या आणि वाईट अनुभवांचा तपशीलही मंडळाला सादर करावा लागणार आहे. या बरोबरच पॉलिसीधारकांच्या हिताचे उत्पादन सुधारण्यासाठी आवश्यक त्या सुधारणांवरही सूचना द्याव्या लागतील.

कंपन्यांना पॉलिसीमध्ये करावा लागेल सुलभ शब्दाचा वापर
आरोग्य विमेशी संबंधित हे स्टेटस रिपोर्ट प्रत्येक आर्थिक वर्षात 30 सप्टेंबरपर्यंत मंडळाच्या सूचना व सुधारणांसाठी घेण्यात येणाऱ्या चरणांची अधिकाऱ्यांकडे माहिती सादर करावी लागेल. 2020-21 आर्थिक वर्षाचा स्थिती अहवाल 20 सप्टेंबर 2021 पर्यंत सादर केला जाईल. विमा नियामकाने कंपन्यांना पॉलिसीमध्ये सुलभ शब्द वापरण्याची सूचना केली आहे जेणेकरुन खरेदीदार ते सहजपणे समजू शकतील. यावर्षी 1 ऑक्टोबरपासून सर्व विमाधारकांना स्पष्ट शीर्षक असलेल्या पॉलिसी कराराचे मानक स्वरूप स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियामकानुसार, करारामध्ये पॉलिसीचे वेळापत्रक, प्रस्तावना, व्याख्या, फायदे, अपवाद, सामान्य अटी आणि तरतुदी समाविष्ट असतील.