Coronavirus Masks : कोरोनापासून बचाव करायचाय? मग मास्क कसा असावा हे जाणून घ्याच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या बाबींवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यात मास्क वापरणे जगभरातील अनेक देशांत बंधनकारक करण्यात आले आहे. भारतातही मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आले आहे.

सध्या अनेक प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. पण कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क नेमका कसा असावा, हे अनेकांना माहिती नसेल. त्यामुळे आता आपण त्याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत…

सर्जिकल मास्क –

कोरोनापासून वाचण्यासाठी तीन लेअरचा मास्क बेस्ट आहे. तीन लेअर असणारा मास्क हवेतील प्रदूषणाचा कणही रोखतो. ‘यूज अँड थ्रो’वाला सर्जिकल मास्कही कोरोनापासून वाचण्यासाठी उपयोगी ठरतो.

कपड्याचा मास्क –

कॉटनचा मास्क लावल्याने श्वास घेण्यात अडचणी येत नाहीत. हा मास्क भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. पण कॉटनचा हा मास्क तीन लेअरचा असावा. हा मास्क धुवूनही वापरता येऊ शकतो. जर तुम्ही कपड्याचा मास्क लावून स्वत:ला सुरक्षित असे मानत नसाल तर त्यावर सर्जिकल मास्कही लावू शकता.

N95 मास्क –

N95 हा सर्वात बेस्ट असा आहे. विना वॉल्व मास्कचा वापर करावा. वॉल्ववाला कोणताही मास्क धोकादायक ठरू शकतो. वॉल्वच्या माध्यमातून हवा आत आणि बाहेर येते-जाते त्यामुळे सदृढ व्यक्तीलाही संक्रमित कऱण्याचा धोका असतो.

रुमाल, टॉवेलचा वापर –

जर तुम्ही जास्त गर्दी नसणाऱ्या ठिकाणी जात असाल तर तुम्ही रुमाल, टॉवेलचा वापर करून तोंड झाकू शकता. तुम्ही रुमाल दोन-तीन लेअरचा बनवू शकता. त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहाल.