कोरोनाच्या गंभीर रूग्णांवरील उपचारात अतिशय उपयोगी आहे प्लाझ्मा, डोनेट करण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ आवश्यक गोष्टी

नवी दिल्ली : कोविड-19 च्या दुसर्‍या लाटेत येथे 80 ते 85 टक्के रूग्ण घरातच बरे होत आहेत. परंतु 15 टक्के लोकांना ऑक्सीजनची आवश्यकता भासत आहे. यांच्या पैकी सुद्धा 5-7 टक्के गंभीर रूग्ण प्लाझ्मा थेरेपीसह विविध इंजेक्शन आणि स्टेरॉईडने बरे होत आहेत. तुम्ही कोरोनातून बरे झाला असाल तर तुमच्याकडे संधी आहे की, तुम्ही गंभीर कोरोना रूग्णांचा जीव वाचवू शकता.

कसा डोनेट करू शकता प्लाझ्मा?
प्लाझ्मा थेरेपीसाठी सर्वप्रथम दान करणार्‍याची टेस्ट होते. टेस्टद्वारे हे पाहिले जाते की, त्यांच्या रक्तात कोणत्या प्रकारचा संसर्ग तर नाही ना. उदाहरणार्थ शुगर, एचआयव्ही किंवा हेपेटायटिस नसल्याची खात्री केली जाते. जर रक्त ठिक असेल तर त्यामधील प्लाझ्मा काढून आयसीयूच्या पेशंटला दिला गेल्यास तो बरा होऊ शकतो.

कशाप्रकारे काम करतो प्लाझ्मा?
कोरोना पॉझिटिव्ह रूग्णात उपचारानंतर रक्तात अँटीबॉडीज येते. डॉक्टरांनुसार, आता त्याच्या ब्लडमधून प्लाझ्मा काढून कोरोना पेशंटला दिला गेल्यास तो बरा होण्यास मदत होईल. ही अँटी बॉडीज रूग्णाच्या रक्तात मिसळून कोरोनाशी लढण्याची शक्ती प्रदान करते.

हे लोक दान करू शकतात
– कोरोना पॉझिटिव्ह झालेले
– आता निगेटिव्ह असलेले
– बरे होऊन 14 दिवस उलटल्यानंतर
– ठिक वाटत असलेले आणि प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी उत्सूक
– त्यांचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे

असे लोक देऊ शकत नाही प्लाझ्मा
– ज्यांचे वजन 50 किलोग्रॅमपेक्षा कमी आहे
– महिला जी कधी प्रेग्नंट राहिली असेल किंवा आता असेल
– डायबिटीजचे रूग्ण जे इन्सुलिन घेत आहेत.
– ब्लड प्रेशर 140 पेक्षा जास्त असेल
– ज्यांना अनियंत्रित डायबिटीज आहे किंवा हायपरटेंशन आहे
– कॅन्सरमधून बरा झालेला व्यक्ती
– ज्या लोकांन मूत्रपिंड/हृदय/फुफ्फुस किंवा लिव्हरचा जुना आजार आहे

अशी सुरू झाली प्लाझ्मा थेरेपीची सुरुवात
नोबल प्राईज विनर जर्मन शास्त्रज्ञ एमिल वॉन बेरिंग यांनी प्लाझ्मा थेरेपीची सुरुवात केली होती. यासाठी त्यांनी सशामध्ये डिप्थीरियाचा व्हायरस टाकला, नंतर त्यामध्ये अँटीबॉडीज टाकली. यानंतर ही अँटीबॉडीज मुलांमध्ये टाकण्यात आली. यासाठी एमिल यांना सेव्हियर ऑफ चिल्ड्रेन म्हटले जाते.