नवीन संशोधनात खुलासा : दररोज कॉफी पिल्याने कमी होतो यकृत कर्करोगाचा धोका

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – कॉफी आरोग्यासाठी कधीही चांगली मानली जात नाही. असे असूनही, जगभरातील लोक कॉफी पिण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्याचा वापर खूप जास्त आहे. काही लोकांची दिवसाची सुरुवात कॉफीने होते. दिवसभरात दोन कप कॉफी प्यायल्याने कोणतीही हानी होत नाही. त्यात कॅफिन असते, ज्यामुळे हृदय गती, रक्तदाब आणि बद्धकोष्ठतेचा धोका वाढतो. तथापि, कॉफी अनेक रोगांमध्ये देखील फायदेशीर आहे. याची पुष्टी एका संशोधनातून झाली असून असे म्हटले आहे की, कॉफी पिण्यामुळे यकृत कर्करोगाचा धोका कमी होतो. जागतिक कर्करोग संशोधन निधीनुसार, 2012 मध्ये सुमारे 800,000 लोकांना कर्करोगाचा त्रास झाला होता.

बीएमजे ओपन जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखानुसार, कॉफी पिणार्‍या लोकांना यकृत कर्करोगाचा धोका कमी असतो. या संशोधनात 26 संशोधनाच्या 20 लाख लोकांच्या निकालावर सखोल अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये असे आढळले की, जो व्यक्ती नियमितपणे कॉफी पितो. त्याला यकृत कर्करोगाचा धोका कमी असतो. तथापि, एखादा व्यक्ती दिवसात किती कप कॉफी पितो यावर ते अवलंबून असते.

जर कोणी एक कप कॉफी पित असेल तर यकृत कर्करोगाचा धोका 20 टक्क्यांनी कमी होतो. त्याचबरोबर जर दोन कप पित असेल तर जोखीम 35 टक्क्यांनी कमी होते. दिवसातून 5 कप कॉफी प्यायल्यामुळे यकृत कर्करोगाचा धोका 50 टक्के कमी होतो.

कॉफी यकृताला कशी मदत करते
यात अ‍ॅण्टीऑक्सिडेंट, अ‍ॅण्टी-इंफ्लेमेटरी, अ‍ॅण्टी-कॅसरोजेनिक गुणधर्म आहेत. यकृत कर्करोगाचा धोका कमी करण्यात या सर्व गुणधर्मांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. म्हणूनच संशोधनात कॉफी यकृत कर्करोग रोखण्यासाठी औषध म्हणून मानली जात आहे. तथापि, त्यात कॅफिन आढळते. अशा परिस्थितीत दिवसभरात फक्त दोन कप कॉफी प्यायली पाहिजे. यामुळे यकृत कर्करोगाचा धोका 35 टक्क्यांनी कमी होऊ शकतो.