Coronavirus : संसर्गापासून वाचण्यासाठी लसीकरणानंतर देखील ‘या’ 3 गोष्टींचे सक्तीने करा पालन; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही मास्क घालणे, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करणे, वारंवार सॅनिटायजरचा वापर करणे, हात धुण्यासारख्या सवयींचे सक्तीने पालन करणे आवश्यक आहे. तरच तुम्ही संसर्गापासून वाचू शकता आणि वाईट स्थितीपासून सुद्धा. याकडे दर्लुक्ष करण्याची चूक करू नका.

मास्क घालणे

व्हॅक्सीन घेतल्यानंतर मास्क घालण्याची आवश्यकता नाही, असे तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा भ्रम आहे. मास्क घालाच, शिवाय सर्व प्रकारची खबरदारी घ्या. मास्कला स्पर्श करू नका.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा

कोरोनाचा प्रभाव आता हवेत सुद्धा आहे, म्हणून असा विचार करू नका की, कितीही सोशल डिस्टन्सिंग पाळले तरी व्हायचे ते होईलच. हे चुकीचे आहे. अगोदर कोरोना झाला नसेल, व्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतले असतील तरी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा.

हातांसाठी साबण किंवा अल्कोहोलयुक्त सॅनिटायजर वापरा

बाहेरून आल्यानंतर, तसेच कोणत्याही पृष्ठ भागाला स्पर्श केल्यानंतर हातांची स्वच्छता आवश्य करा. खाण्यापूर्वी आणि नंतर, बनवण्यापूर्वी, डोळे किंवा नाकाला स्पर्श केल्यास हात धुणे अतिशय आवश्यक आहे. व्हॅक्सीनेशन नंतर सुद्धा या गोष्टींची काळजी घेतली तरच तुम्ही सुरक्षित राहू शकतो.