Covid-19 And Oxygen : जास्त ऑक्सिजन पोहोचू शकते फुफ्फुसाला गंभीर इजा; ‘या’ लक्षणांवर द्या लक्ष, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन : देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्ययंत्रणांवर याचा मोठा ताण येत आहे. त्यातच ऑक्सिजन कमी होत असल्याने अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. काही ठिकाणी तर ऑक्सिजनअभावी अनेक रुग्ण दगावत आहेत. पण तुम्हाला जास्त प्रमाणात ऑक्सिजन दिला गेला तर तुमच्या फुफ्फुसावर याचा परिणाम करू शकतो.

शरीरातील ऑक्सिजनची लेव्हल कमी झाल्यानंतर अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जाते. पण सध्या अनेक रुग्णालयांत बेड्सही उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक लोक घरातच ऑक्सिजन सिलेंडर मागवतात. डॉक्टरांच्या सल्ल्याविनाच ऑक्सिजन सुरु करतात. हे करणे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. पारस रुग्णालय, गुरुग्रामचे वरिष्ठ पल्मोनोलॉजिस्ट आणि पारस चेस्ट इन्स्टिट्यूटचे विभागप्रमुख डॉ. अरुणेश कुमार यांनी सांगितले, की ‘जास्त प्रमाणात ऑक्सिजन घेतल्याने विषाक्तता होऊ शकते. जेव्हा गरजेपेक्षा जास्त प्रमाणात ऑक्सिजन घेतल्यास रुग्णाच्या फुफ्फुसात दुष्परिणाम करू शकतो. याने खोकला आणि श्वास घेण्यात अडचणीही येऊ शकतात. अनेक गंभीर प्रकरणात हे मृत्यूचे कारणही बनू शकते.’

या समस्येवर उपाय काय?

ऑक्सिजन विषाक्ताता रोखता येऊ शकते. त्यासाठी सप्लिमेंट ऑक्सिजनच्या सेवनला मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही व्हेंटिलेटरवर असता तेव्हा तुमची हेल्थकेअर टीम ऑक्सिजन मशिनमध्ये ऑक्सिजनची मात्रा मर्यादित ठेवत असते.

मृत्यूचे कारणही बनू शकते जास्त ऑक्सिजन

डॉ. पीयूष गोयल यांनी सांगितले, की ऑक्सिजन विषेलापन झाले म्हणजे फुफ्फुसाला नुकसान पोहोचू शकते. जास्त प्रमाणात ऑक्सिजन घेतल्यास फुफ्फुसात छोटी वायूची पिशवी द्रवपासून भरू शकते. जास्त खोकला आणि श्वास घेण्यात अडचणी येऊ शकतात. परिणामी, रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.

ही लक्षणेही दिसू लागतात…

– खोकला येणे

– गळ्यात जळजळ होणे

– छातीत दुखणे

– श्वास घेण्यात त्रास

– चेहरा आणि हातांमध्ये मांसपेशिचे हालणे

– चक्कर येणे