बदलत्या हवामानात नाक बंद होण्याच्या समस्येतून होईल सुटका, करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  जर तुम्ही नेहमी नाक बंद होण्याच्या समस्येने त्रस्त होत असाल तर काही घरगुती उपाय तुम्हाला नक्कीच दिलासा देऊ शकतात. डोकं जड होणे तसेच नाक बंद झाल्याने श्वास घेण्यास त्रास होतो. असे लोक सामान्यपणे सायनोसायटिस (सायनस) च्या समस्येने ग्रस्त असतात. यावर काही घरगुती उपाय असून ते जाणून घेवूयात…

हे उपाय करा

1. कारपेट, डोअरमॅट, गाद्या आणि उशा स्वच्छ ठेवा.

2.किचनमध्ये चिमणी लावा. परफ्यूम आणि अगरबत्ती पासून दूर रहा. घरात क्रॉस व्हेंटिलेशनची चांगली व्यवस्था असावी.

3. उन्हाळ्यात एसीमधून बाहेर उन्हात जायचे असेल तर अर्धातास अगोदर एसी बंद करा. नंतर बाहेर पडा.

4. तणावमुक्त राहा.

5. रोज आठ ते दहा ग्लास पाणी प्या.

6. व्हायरस इन्फेक्शन असलेल्यांपासून दूर राहा.

7. काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा.

8. घराबाहेर पडण्यापूर्वी मास्क घाला.

9. स्टीम घेणे सुद्धा लाभादायक आहे.

10. जल नेती, कुंजल, अनुलोम-विलोम आणि भस्त्रिका प्राणायाम करा.

11. अल्कोहोल आणि सिगारेटपासू दूर राहा.

12. सायनस असल्यास काळीमिरी पावडर टोमॅटो सूप प्या.

13. तुळस-आल्याचा चहा किंवा ग्रीन टी प्या.

14. हिरव्या भाज्यांचे सेवन करा.

15. नियमित नारळपाणी प्या. सायनसची समस्या दूर होईल.

16. आंबट फळांचे सेवन करू शकता.

17. जेवणात लसणाचा वापर आवश्य करा.

18. सामान्यपणे औषधांचे सेवन आणि सुरक्षेने सायनसची समस्या दूर होऊ शकते.