Weight Loss Tips : उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी रोज रिकाम्या पोटी प्या काकडीचे पाणी

नवी दिल्ली :वृत्त संस्था – तुम्ही लठ्ठपणामुळे त्रस्त असाल आणि वाढते वजन नियंत्रित करायचे असेल तर उन्हाळ्याच्या या दिवसात रोज काकडीचे पाणी प्या. अनेक शोधांमध्ये याचा खुलासा झाला आहे की, वाढत्या वजनाला काकडीच्या पाण्याने कंट्रोल केले जाऊ शकते. याबाबत सर्वकाही जाणून घेवूयात…

काकडी
युएस फुड अ‍ॅन्ड ड्रग्जच्या डाएट चार्टनुसार, 100 ग्रॅम काकडीत अवघ्या 10 कॅलरी असतात. तर 95 टक्के पाणी असते. यामध्ये फायबर भरपूर असते. एका संशोधनानुसार कुकम्बर डाएट प्लॅन फॉलो करण्याच्या अवघ्या 7 ते 14 दिवसात 7 किलो वजन कमी केले जाऊ शकते. या डाएट प्लॅनमध्ये फळे, भाज्या आणि प्रोटीन युक्त वस्तू जसे की, अंडी, चिकन, मासे खाण्याचा सल्ला दिला जातो.

हे आहेत फायदे
1 काकडीतील एरेप्सिन आतड्यांना स्वच्छ करण्यास मदत करते
2 यातील फायबरमुळे बराच काळ पोट भरल्यासारखे वाटते.
3 वारंवार खाण्याची सवय दूर होते.
4 शरीरातील टॉक्सीन बाहेर काढले जाते.
5 शरीरातील एक्स्ट्रा फॅट बर्न होते.

असे तयार करा काकडीचे पाणी
काकडीचे छोटे-छोटे तुकडे करा. ते ग्राईंड करून घ्या. एका जारमध्ये पाणी घ्या. चवीसाठी लिंबूरस सुद्धा मिसळू शकता. आता ग्राईंड केलेली काकडी जारमधील पाण्यात चांगली मिसळून घ्या. विशेषकरून सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्याने वजन नियंत्रित करण्यास मदत होते.