Corona Vaccine : कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीनमध्ये कोणती चांगली, जाणून घ्या याबाबत सरकारचं म्हणण

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु होत आहे. त्यातच कोरोनावर दोन लसी भारतात आहेत एक कोविशिल्ड आणि दुसरी कोव्हॅक्सिन. पण या दोन्हीमध्ये कोणती लस चांगली असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्यावर आता केंद्र सरकारनेच माहिती दिली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, दोन्ही लसींची तुलना केली जाऊ शकत नाही. दोन्ही लसी लसीकरण इन्फेक्शन आणि त्यानंतर निर्माण होणाऱ्या गंभीर स्थितीपासून वाचण्यास मदतीचे ठरते.

काय फरक आहे कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनमध्ये जाणून घ्या…

कोविशिल्ड

कोविशिल्ड ही लस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनेकाच्या मदतीने तयार केली गेली आहे. ही लस पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने निर्मित केली आहे. कोविशिल्डला सिंगल व्हायरसच्या माध्यमातून बनवण्यात आले आहे.

साईड इफेक्ट्स काय?

कोविशिल्ड ही लस घेतल्यानंतर लस घेतल्याच्या जागी वेदना होतात. लाल होणे, ताप, अंगदुखी यासांरखी समस्या निर्माण होते.

किंमत किती?

सरकारने या लशीची किंमत 150 रुपये ठेवली आहे. राज्य सरकारने 400 रुपये आणि खाजगी रुग्णालयात 600 रुपयांना लस मिळणार आहे.

कोव्हॅक्सिन

आयसीएमआर आणि भारत बायोटेकने ही लस तयार केली आहे. या लसीमध्ये डेड व्हायरस आहे जो शरीरात जाऊन तुमच्या शरीरात अँटीबॉडी तयार करतो. यामाध्यमातून खरा व्हायरस ओळखता येऊ शकतो. ही लस कोरोनाच्या सर्व वेरियंटमध्ये प्रभावी मानली जाते.

साईड इफेक्ट्स काय?

ही लस टोचून घेतल्यानंतर सूज, वेदना, ताप येणे, घाम येणे, थंडी वाजणे, डोकेदुखी सारखी समस्या जाणवते.

किंमत किती?

कोविशिल्डच्या तुलनेने याची किंमत जास्त आहे. राज्य सरकारसाठी याची किंमत 400 रुपये आहे. तर खासगी रुग्णालयात 1200 रुपयांना ही लस मिळणार आहे.