Covid-19 and Toothbrush : कोरोनातून बरे झाल्यानंतर सर्व प्रथम टूथ ब्रश बदला, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण बरे झाल्यानंतरही काही विशेष गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. असे केल्याने संभाव्य धोका टाळता येऊ शकतो.

कोरोनातून बरे झाल्यानंतर सर्वात आधी तुम्ही तुमचा टूथब्रश बदला. तुमचा ब्रश आणि तुमची जीभ क्लिनर तुम्हाला दुसऱ्यांदा संक्रमित होण्यापासून दूर ठेवू शकते. डेंटिस्टनुसार, जर अशी व्यक्ती ती नुकतीच कोरोनातून बरी झाली तिने त्वरीत तिचा टूथब्रश बदलणे गरजेचे आहे. टूथब्रश बदलल्याने संक्रमणाचा धोका पुन्हा उद्भवण्याची शक्यता कमी असते. तसेच दुसऱ्यांनाही याचा धोका पोहोचू शकत नाही. वातावरणानुसार आलेला ताप, खोकला आणि सर्दीतून बरे झालेल्या लोकांनीही त्यांचा ब्रश लवकर बदलावा.

जीभ क्लिनरही बदला

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाने कॉमन जीभ क्लिनरचा वापर करू नये. कोरोनातून बरे झाल्यानंतर रिकव्हरीच्या 20 दिवसानंतर जीभ क्लिनर बदलून तुम्ही संक्रमण रोखू शकता. त्यामुळे तुम्ही पुन्हा कोरोनापासून दूर राहू शकता.

तोंडातील बॅक्टेरिया मारण्यासाठी…

तोंडात लपलेल्या व्हायरस किंवा बॅक्टेरियाला नष्ट करण्यासाठी सर्वात बेस्ट उपाय आहे गरम पाणी. गरम पाण्यात मीठाची काही मात्रा टाकून गुळण्या कराव्या. त्यामुळे तोंडसाफ होते.