Corona Vaccination : ‘या’ तारखेला दिला जाणार ‘कोरोना’चा दुसरा डोस, मोदी सरकारनं जाहीर केली तारीख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  भारतामध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. देशात 16 जानेवारी पासून लसीकरण मोहिम सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. आता त्यांना दुसरा डोस 13 फेब्रुवारीपासून दिला जाणार आहे, अशा माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के पॉल (Dr. V.k. paul) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोरोना प्रतिबंधक देशव्यापी लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात 16 जानेवारी पासून करण्यात आली होती. आरोग्य कर्मचाऱ्यांना आतापर्यंत केवळ पहिलाच डोस देण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. व्ही.के. पॉल यांनी दिली.

https://fb.watch/3rMF6RbkGj/

आयसीएमआर या संस्थेकडून सांगण्यात आले आहे की, तिसऱ्या देशव्यापी सेरो सर्वेक्षणानुसार देशाच्या बऱ्याच मोठ्या लोकसंख्येला अद्याप कोविड-19 चा धोका आहे. 17 डिसेंबर ते 8 जानेवारी या कालावधीत सर्वेक्षण करण्यात आलेल्या लोकसंख्येपैकी 21.5 टक्के लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन गेल्याचे आढळून आले आहे.भारतात 16 जानेवारी पासून देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु करण्यात आले. दररोज लसीकरण होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील 19 दिवसांमध्ये 45 लाख जणांना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला आहे, अशी माहिती मंत्रालयाने गुरुवारी दिली. 24 तसांच्या कालावधीत 8 हजार सत्रांमध्ये 3 लाख 10 हजार 604 जणांना लस देण्यात आली. आतापर्यंत लसीकरणाची 84 हजार 617 सत्रं पार पडल्याचे मंत्रालयाने सांगितले.

कोरोना लसीकरण मोहिमेत आरोग्य कर्मचाऱ्यांसह कोरोना योद्ध्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जात आहे. त्यात कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रत्यक्ष युद्धपातळीवर लढणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात ज्येष्ठ नागरिक, तसंच सामान्य नागरिकांना लस दिली जाणार आहे.